Skip to content Skip to sidebar Skip to footer

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

थिएटर असो किंवा नाट्यगृह फक्त त्यांच्या नावानेच हाऊसफुल्लचा बोर्ड लागायचा असे ग्रेट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांची आठवण येणार नाही असा एकही दिवस त्यांच्या चाहत्यांसाठी जात नसेल. लोकांना खळखळून हसवणाऱ्या लक्ष्या मामांचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. आज आपण त्यांचा असा एक किस्सा जाणून घेणार आहोत त्यात चक्क बॉलिवूडचे हॅंडसम हिरो जितेंद्र यांच्यामुळे बेर्डेंनी त्यांच्या वडिलांचा मार खाल्ला होता… काय घडलं होतं नेमकी जाणून घेऊयात. (Jeetendra)

लक्ष्मीकांत बेर्डे ५ भावंडांपैकी एक. घरात वडिल एकटेच कमावते त्यामुळे घरची स्थिती तशी हलाखीचीच होती. पण बालपणी लक्ष्यामामांनी फारच धमाल केली होती. लक्ष्मीकांत यांच्या बालपणीच्या हट्टांपैकी एक किस्सा खास चर्चेत आहे. त्यांना त्या काळात बॉलिवूड अभिनेते जितेंद्र यांची प्रचंड क्रेझ होती. पांढरे शूज आणि घट्ट पॅन्ट ही जितेंद्रची सिग्नेचर स्टाईल ९०च्या दशकात तरुणांमध्ये फेमस होती, पोरी तर त्यांच्यावर जीव ओवाळून टाकायच्या. एकदा लक्ष्मीकांत देखील या फॅशनमुळे प्रभावित झाले आणि त्यांनी हट्ट करून त्याच टाईट पॅन्टची नक्कल करायला सुरुवात केली.

मग काय? परिणाम जरा गंभीर ठरला. पॅन्ट इतकी घट्ट होती की साधं बसतं किंवा उभं राहताही कठीण झाले. एक दिवस हालचाल करताना ती महागडी पॅन्ट फाटली, ज्यामुळे वडिलांचा पारा चढला. घरच्या परिस्थितीला तोंड देत, त्या दिवशी त्यांना चांगलाच चोप बसला. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी जेव्हा लक्ष्मीकांत हिंदी चित्रपटांत काम करू लागले, तेव्हा एका मुलाखतीदरम्यान खुद्द जितेंद्र उपस्थित होते. त्या प्रसंगी मिश्किलपणे लक्ष्मीकांत म्हणाले, ‘सर, तुमच्या त्या टाईट पॅन्टच्या स्टाईलमुळे मी लहानपणी वडिलांचा खूप मार खाल्लाय.’ या प्रांजळ कबुलीने जितेंद्रही आपलं हसू लपवू शकले नव्हते. जितेंद्र आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ‘संतान’, ‘आदमी खिलौना है’, ‘ये रात फिर ना आएगी’ या हिंदी चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. (Laxikant Berde & Jeetendra Movie Together)

================================

हे देखील वाचा : Jeetendra : “मराठी बोलता येत होतं म्हणूनच मी अॅक्टर झालो”

================================

लक्ष्मीकांत यांना लहानपणी बस कंडक्टर होण्याची इच्छा होती. त्यांना वाटायचं की कंडक्टरकडे तिकिटांचे खूप पैसे असतात आणि ते स्वतःकडे ठेवून श्रीमंत होऊ शकतात. मात्र, जेव्हा त्यांना समजलं की हे पैसे सरकारी तिजोरीत जमा करावे लागतात, तेव्हा त्यांनी हा नाद सोडून अभिनयाकडे वळले. आणि त्यांनी नाटक, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपलं वर्चस्व गाजवलं. (Marathi Entertainment News)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!