Skip to content Skip to sidebar Skip to footer

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’ भेटीला येतेय १६ मार्च पासून…

मराठी मनोरंजनविश्वात सामाजिक भान जपणाऱ्या, भावनिक गुंतवणूक असलेल्या आणि वास्तवाशी नातं सांगणाऱ्या कथा सादर करण्याची परंपरा जपणाऱ्या स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर १६ मार्चपासून ‘आनंदी’ (Ananadi New Serial) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वेगळ्या धाटणीची नायिका आणि प्रेरणादायी आशय यामुळे ही मालिका आधीपासूनच उत्सुकता निर्माण करत आहे.‘आनंदी’ ही कथा आहे एका तरुणीची जी एका अपघातात आपली दृष्टी गमावते. आयुष्यात अचानक आलेल्या या मोठ्या धक्क्यानंतर अनेक जण खचून गेले असते, पण आनंदी मात्र वेगळी आहे. डोळ्यांनी जग दिसेनासं झालं तरी तिचं मन मात्र अधिक जागं होतं. ती प्रत्येक गोष्ट स्पर्शातून, आवाजातून, सुगंधातून आणि भावनांतून अनुभवते. तिच्यासाठी अंधत्व ही केवळ शारीरिक अवस्था आहे; तिच्या आत्मविश्वासावर किंवा जगण्याच्या इच्छेवर त्याचा परिणाम होत नाही. उलट, ती अधिक संवेदनशील, अधिक समजूतदार आणि अधिक ठाम बनते. (Anandi New Serial)

Anandi New Serial
Star Pravah Anandi New Serial

आनंदीचा स्वभाव मनमोकळा आणि मदतीसाठी तत्पर आहे. ती स्वतःच्या वेदनेत अडकून न राहता इतरांच्या अडचणी ओळखते आणि शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करते. तिचा विश्वास आहे की डोळे कधी कधी भ्रम निर्माण करू शकतात, पण मन कधीच चुकीचं मार्गदर्शन करत नाही. म्हणूनच ती प्रत्येक नातं, प्रत्येक परिस्थिती आणि प्रत्येक व्यक्ती मनापासून समजून घेते. तिच्या सकारात्मकतेमुळे तिच्या आसपासचं वातावरणही आनंदी होतं. या मालिकेविषयी बोलताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे (Satish Rajwade) यांनी सांगितले की, वेगळ्या व्यक्तिरेखा सादर करणं ही वाहिनीची ओळख आहे. आपल्या आजूबाजूला अशा अनेक प्रेरणादायी व्यक्ती असतात, ज्या परिस्थितीवर मात करून आयुष्य सुंदर बनवतात. आनंदीची कथा अशाच जिद्दीची आणि आशावादाची आहे. तिच्या नजरेतून म्हणजेच तिच्या दृष्टिकोनातून जग पाहताना प्रेक्षकांना नक्कीच नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल, असा त्यांचा विश्वास आहे.

Anandi New Serial
Star Pravah Anandi New Serial

या मालिकेतून अभिनेत्री जाई खांडेकर (Actress Jai Khandekar) छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. रंगभूमीवर अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन अशा विविध क्षेत्रांत काम केलेल्या जाईसाठी ही भूमिका एक मोठं आव्हान आहे. ‘आनंदी’ ही केवळ व्यक्तिरेखा नसून ती एक भावना आहे, असं जाईचं मत आहे. या भूमिकेसाठी तिने अंध मुलांच्या संस्थेत जाऊन त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा जवळून अनुभव घेतला. त्यांच्या चालण्याच्या, बोलण्याच्या, जगण्याच्या पद्धती समजून घेत त्या भावविश्वाशी नातं जोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिची भूमिका अधिक वास्तववादी आणि प्रभावी बनली आहे. (Anandi New Serial)

=================================

हे देखील वाचा: मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला ही बसेल आश्चर्याचा धक्का!

=================================

‘आनंदी’ ही मालिका केवळ मनोरंजनासाठी नाही, तर आयुष्याकडे सकारात्मक नजरेने पाहण्याची शिकवण देणारी आहे. अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी मनात आशा आणि धैर्य असेल तर जगणं सुंदर होऊ शकतं, हा संदेश या कथेतून दिला जाणार आहे. मनाला स्पर्श करणारी, प्रेरणादायी आणि भावनिक गुंतवणूक असलेली ही नवी मालिका १६ मार्चपासून फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!