
Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat यांची भावनिक पोस्ट…
‘Bigg Boss Marathi 6’ च्या सहाव्या आठवड्यात अखेर प्रेक्षकांची उत्सुकता संपली आणि घरातून बाहेर जाणाऱ्या स्पर्धकाचं नाव जाहीर झालं. या आठवड्यात रोशन, सागर, राकेश, दीपाली, अनुश्री, रुचिता, सचिन, प्रभू आणि प्राजक्ता असे नऊ जण नॉमिनेशनमध्ये होते. मतदानाच्या चुरशीच्या लढतीनंतर रोशन, रुचिता आणि सचिन हे तिघे डेंजर झोनमध्ये पोहोचले. अखेर कमी मतांमुळे ‘खान्देश किंग’ म्हणून ओळखला जाणारा सचिन कुमावत (Sachin Kumavat) यांचा प्रवास इथेच थांबला. अहिराणी गाण्यांमुळे लोकप्रिय असलेला सचिन घरात शांत, संयमी आणि प्रामाणिक खेळासाठी ओळखला गेला. तो आक्रमक राजकारणापेक्षा नातेसंबंध जपण्यावर विश्वास ठेवताना दिसला. मात्र, स्वतःची ठाम भूमिका कमी वेळा मांडल्याची चर्चा घरातही झाली. खेळात रणनीतीपेक्षा साधेपणा जपल्यामुळे त्याला प्रेक्षकांकडून अपेक्षित मतदान मिळालं नाही, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसत आहे. (Bigg Boss Marathi 6)

घरातून बाहेर आल्यानंतर सचिनने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर भावनिक पोस्ट शेअर केली. बिग बॉस मराठी च्या मंचावर पोहोचणं हे स्वप्नवत असल्याचं सांगत त्याने सहा आठवड्यांचा प्रवास अभिमानाने पूर्ण केल्याची भावना व्यक्त केली. “द्वेष न करता, प्रामाणिकपणे खेळलो,” असं म्हणत त्याने चाहत्यांचे आभार मानले. #khandeshking हा हॅशटॅग वापरत त्याने आपल्या मुळाशी असलेल्या ओळखीची जाणीवही करून दिली.सचिनच्या एलिमिनेशननंतर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी त्याला “मनाने विजेता” म्हटलं, तर काहींनी त्याच्या शांत खेळाचं कौतुक केलं. घरातल्या चढ-उतारांमध्ये, टास्कदरम्यानच्या तणावात आणि मतभेदांमध्येही त्याने संयम राखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याची प्रतिमा एक सुसंस्कृत आणि मनमिळाऊ स्पर्धक अशी तयार झाली.

दरम्यान, घरात सध्या १२ ते १३ स्पर्धक उरले असून लवकरच वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ‘भाऊच्या धक्का’वर होस्ट रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांनी काही स्पर्धकांमध्ये मुद्दाम चुणचुणीत चर्चा पेटवल्याने पुढील आठवडा अधिक रंजक होण्याची चिन्हे आहेत. नव्या समीकरणांमुळे खेळाचा रंग आणखी बदलणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. (Bigg Boss Marathi 6)
====================================
====================================
सचिनचा प्रवास सहा आठवड्यांत थांबला असला तरी त्याने जिंकलेलं प्रेक्षकांचं प्रेम कायम राहणार आहे. “महाराष्ट्राने दिलेल्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू,” असा संदेश देत त्याने पुढील वाटचालीची चाहूलही दिली आहे. आता घरातील उर्वरित स्पर्धकांमध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठीची चुरस अधिक तीव्र होणार आहे.