Skip to content Skip to sidebar Skip to footer

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची कबूली दिलीच!

सोशल मिडियावर बऱ्याच दिवसांपासून विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या लग्नाचीच चर्चा सुरु होती. एअरपोर्ट किंवा फिरायला देखील ते एकत्र गेल्याचं स्पॉट झालं होतं पण त्यांनी आपल्या नात्याची किंवा लग्नाची कबूली दिली नव्हती. अखेर आता तो दिवस आला असून रश्मिका आणि विजय यांनी सोशल मिडियावर लग्नाबद्दल महत्वाची अप़डेट दिली आहे. काय आहे रश्मिकाची पोस्ट जाणून घेऊयात…

रश्मिका मंदानाने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत लिहिलं आहे की, ‘आमच्या चाहत्यांनो, आम्ही कोणताही प्लॅन करण्यापूर्वी, आम्ही स्वतःसाठी काही निवडण्यापूर्वी, तुम्ही आमच्यासोबत होतात. तुम्ही आम्हाला प्रेमाने नाव दिलंय, VIROSH म्हणून आज, खूप प्रेमाने आम्ही आमच्या लग्नाला एक नाव देतोय. ‘विरोश’चं लग्न. प्रेमाने आमच्या पाठीशी कायम उभं राहिल्याबद्दल धन्यवाद. तू नेहमीच आमच्यासोबत राहाल. खूप प्रेम.’ विजयने देखील स्टोरी रिपोस्ट केली असून चाहत्यांनी आनंदाने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Vijay & Rashmika Marriage)

आता तुम्हाला तसं प्रश्न पडण्याचं काही कारण नाही की VIROSH म्हणजे काय? तर सेलिब्रिटी आपल्या आणि पार्टनरच्या नावाला एकत्रित करुन एक शॉर्ट नाव देतात… उदा. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा VIRUSHKA, दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंग DeepVeer, रणवीर कपूर आणि आलिया भट्ट RaaLia, सैफ अली खान आणि करिना कपूर SaifeEna, विकी कौशल आणि कॅटरिना कैफ ViKat. तसंच, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा ViRosh. विजय आणि रश्मिकाच्या चाहत्यांनी त्यांना हे नाव दिलं असून त्यांनी तेच आपल्या लग्नपत्रिकेतही वापरलं आहे. (Entertainment Trending News)

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार २६ फेब्रुवारीला उदयपूरमध्ये विजय आणि रश्मिका लग्न करणार असल्याचं सांगितलं जात आहे. या लग्नात नो फोन पॉलिसी असणार असून केवळ घरातील मंडळी आणि अगदी जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित राहणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. तसेच, ४ मार्चला हैदराबादमध्ये कलाकारमंडळींसाठी हैदराबादमध्ये रिसेप्शन ठेवलं जाणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. (South Indian Films)

================================

हे देखील वाचा : Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक करायचं…”; सदस्याने सांगितला ‘तो’ किस्सा

================================

बरं, इतके दिवस जरी विजय-रश्मिका आपल्या नात्याबद्दल बोलत नसले तरी काहीदिवसांपूर्वी विजयचं हैदराबाद येथील घर रोषणाईने चमकल्यानंतर लोकांचा अंदाज ठाम विश्वासात परिवर्तित झाला होता. आता विजय-रश्मिका लग्नबंधनात अडकणार हे फिक्स झालं असून त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्याची उस्तुकला अधिकच शिगेला पोहोचली आहे. तसेच, त्यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांची ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री स्पष्टपणे दिसत होती. रश्मिका आणि विजय यांनी ‘गीता गोविंदम’ आणि ‘डियर कॉम्रेड’ या दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. आता विजय आणि रश्मिकाचा ‘रणबाली’ हा तिसरा चित्रपट  लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!