Skip to content Skip to sidebar Skip to footer

Saade Maade 3 : कुरळे ब्रदर्सचा ‘नो लेडीज, नो मॅरेज’, नियम मोडायला ‘ती’ आलीये

अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या साडे माडे ३ चा टीझर रिलीज झाला आहे. ज्यांच्या आयुष्यात स्त्रियांना अजिबात स्थान नाही त्यांच्या आयुष्यात जर एका स्त्रीची एंट्री झाली तर? ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये असंच काहीस पाहायला मिळतंय. रतन, मदन, चंदन व बबन यांच्या आयुष्यात कामिनीची एंट्री झाली आहे. यांच्या आयुष्यात कामिनीच्या येण्याने काय घडेल, हे पाहाणे अतिशय रंजक ठरणार आहे. कामिनीच्या येण्याने उडणारी तारांबळ, गोंधळ आणि विनोद यांची धमाल झलक टीझरमध्ये दिसतेय.

कामिनीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू या चित्रपटातून कुरळे ब्रदर्सच्या गँगमध्ये सामील झाली आहे. शिस्तप्रिय भावंडांमध्ये बिनधास्त कामिनीची एंट्री होणं म्हणजे डबल गोंधळ, डबल विनोद! कठोर स्वभावाचा रतन, विनोदी मदन, निरागस स्वभाव असलेला चंदन या भिन्न स्वभावांच्या भावांसोबत आणि खट्याळ बबन बरोबर तिची केमिस्ट्री कशी जमेल? हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

रिंकू राजगुरू म्हणते, “ ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’सारख्या मोठ्या आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान असलेल्या चित्रपटाच्या सीक्वेलचा भाग होणं हे माझ्यासाठी खूप खास आहे. अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक अंकुश चौधरी यांच्यासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळालं.”

================================

हे देखील वाचा : शाहरुख खानमुळे ‘मुन्नाभाई ३’ अडकला? Arshad Warsi याने केला मोठा खुलासा

================================

अंकुश चौधरी यांची कथा, संदीप दंडवते यांची पटकथा व संवाद लाभलेल्या या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक, संजय नार्वेकर आणि समृद्धी केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण संजय जाधव यांनी केले आहे. येत्या ३० जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!