Skip to content Skip to sidebar Skip to footer

Bigg Boss Marathi 6 मध्ये होणार  राजकीय नेत्याची एन्ट्री? रितेश भाऊने दिली हिंट

महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असतानाच मनोरंजनविश्वातही एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘Bigg Boss Marathi’च्या सहाव्या पर्वाची अधिकृत घोषणा होताच प्रेक्षकांची नजर थेट एका प्रश्नावर खिळली आहे. यंदा बिग बॉसच्या घरात कोण कोण सहभागी होणार? ११ जानेवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या या नव्या सीझनबाबत सोशल मीडियावर तर्क-वितर्कांचा पाऊस सुरू आहे. विशेष म्हणजे, राज्यात निवडणुकीची चर्चा रंगात असताना एखादा राजकीय चेहरा थेट बिग बॉसच्या घरात एंट्री घेणार का, याची जोरदार चर्चा होत आहे.(Bigg Boss Marathi 6) 

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6

या सगळ्या चर्चांवर नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत शोचा होस्ट रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) याला थेट प्रश्न विचारण्यात आला. “बाहेर राजकीय तिकीटासाठी रस्सीखेच सुरू असताना, बिग बॉसच्या घरात एखादा नेता दिसेल का?” असा सवाल होताच रितेशने नेहमीप्रमाणे मिश्किल अंदाजात उत्तर दिलं. तो हसत म्हणाला की,“ज्यांना बाहेर पक्षाचं तिकीट मिळालेलं नसेल, त्यांना इथे संधी मिळू शकते. खरं सांगायचं तर मला स्वतःलाही आत कोण जाणार आहेत हे माहीत नाही. पण एक गोष्ट नक्की हा सीझन जबरदस्त होणार आहे.” रितेशच्या या उत्तरानंतर मंचावर उपस्थित असलेल्या जान्हवी किल्लेकर (Janhavi KIllekar) हिनेही वातावरण हलकंफुलकं केलं. ती म्हणाली, “राजकीय तिकीट मिळवणं कदाचित सोपं असेल, पण बिग बॉसच्या घरात जाण्याची संधी मिळणं त्याहून कठीण आहे.” तिच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6

यंदाचा ‘Bigg Boss Marathi 6’ हा फक्त ग्लॅमरपुरता मर्यादित न राहता मनोरंजन, विनोद आणि रणनीती यांचा जबरदस्त मिलाफ असणार असल्याचं बोललं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hava Yeu Dya) मुळे घराघरात पोहोचलेला सागर कारंडे (Sagar Karande) यंदा बिग बॉसच्या घरात धमाल करताना दिसू शकतो. त्याचबरोबर अभिनय आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांत सक्रिय असलेली दीपाली सय्यद (Deepali Sayyad) यांचं नावही चर्चेत आहे. प्रेक्षकांना आपल्या अभिनयातून हसवणारा अंशुमन विचारे (Anshuman Vichare) देखील या पर्वात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि डिजिटल स्टार्सनाही‘स्वर्ग आणि नर्क’ या अनोख्या थीमअंतर्गत खेळण्याची संधी मिळू शकते.(Bigg Boss Marathi 6)

==============================

हे देखील वाचा: अखेर Shashank Ketkar ने स्क्रिन शॉट्ससह शेअर केलं 5 लाख बुडवणाऱ्या ‘त्या’ निर्मात्याच नाव !

==============================

अधिकृत यादी जाहीर होईपर्यंत प्रेक्षकांना अंदाज बांधण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, एक गोष्ट नक्की की सध्या सुरु असलेल्या राजकारणाच्या गदारोळात ‘बिग बॉस मराठी ६’ हे पर्व मनोरंजनाची वेगळीच रंगत आणणार आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!