Skip to content Skip to sidebar Skip to footer

Ranapati Shivray Swari Agra Trailer: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित !

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रम आणि नेतृत्वासाठी ओळखले जात नाहीत, तर त्यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेने, दूरदृष्टीने आणि अचूक रणनीतीने इतिहासात अढळ स्थान निर्माण केले आहे. असामान्य नियोजनशक्तीच्या जोरावर त्यांनी अनेक बलाढ्य शत्रूंना पराभूत केले. औरंगजेबासारख्या धूर्त आणि क्रूर शत्रूसमोरही शिवराय आपल्या बुद्धीने आणि धैर्याने वरचढ ठरले. त्यांचं आग्रा प्रकरण हे अतिशय धोकादायक असतानाही, त्यातून त्यांनी दाखवलेलं नेतृत्व आजही थक्क करणारं आहे. हा संपूर्ण शौर्याचा, बुद्धिमत्तेचा आणि संघर्षाचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत झाला, निमित्त ठरलं ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ (Ranapati Shivray Swari Agra) या भव्य मराठी चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण सोहळ्याचं. या सोहळ्याची सुरुवात शिववंदनेने झाली, तर शिवशाहिरांनी सादर केलेल्या जोशपूर्ण पोवाड्यांनी वातावरण भारावून टाकलं. (Ranapati Shivray Swari Agra Trailer)

Ranapati Shivray Swari Agra Movie
Ranapati Shivray Swari Agra Marathi Movie

आज मराठी चित्रपटसृष्टी केवळ आशयातच नव्हे, तर तंत्रज्ञान आणि प्रसिद्धीच्या नव्या कल्पनांमध्येही मोठी झेप घेत आहे. ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाच्या निमित्ताने इतिहासातल्या महान व्यक्तिमत्त्वांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी जोडण्याचा अनोखा प्रयत्न करण्यात आला आहे. या कार्यक्रमात महाराजांचे गुप्तहेरप्रमुख, ‘तिसरा डोळा’ म्हणून ओळखले जाणारे बहिर्जी नाईक यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित AI चॅटबॉटचे अनावरण करण्यात आले. हा चॅटबॉट विविध भाषांमध्ये युजर्सच्या प्रश्नांना काही सेकंदांत उत्तर देतो, ही बाब मराठी सिनेसृष्टीसाठी आणि शिवप्रेमींसाठी अभिमानास्पद आहे.

Ranapati Shivray Swari Agra Movie
Ranapati Shivray Swari Agra Marathi Movie

औरंगजेबाच्या दरबारात, चारही बाजूंनी कडेकोट पहारा, विश्वासघाताची शक्यता आणि निराशेचं वातावरण असताना शिवाजी महाराजांची आग्रा भेट घडली होती. अशा बिकट परिस्थितीत माणसांची अचूक पारख करणारे, राजकीय सूजबूज असलेले महाराज ही स्वारी कशी यशस्वी करतात, याची प्रभावी झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित, लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट ३० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून शिवरायांच्या अष्टपैलू नेतृत्वाचा, शिस्तबद्ध नियोजनाचा आणि पराक्रमाचा अनुभव नव्या पिढीला मिळेल, असा विश्वास दिग्पाल लांजेकर यांनी व्यक्त केला. शिवकालातील इतिहासातील एक तेजस्वी पर्व प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केल्याचंही त्यांनी नमूद केलं.(Ranapati Shivray Swari Agra Trailer)

===========================

हे देखील वाचा: Rubaab Marathi Movie Trailer: प्रेम, संघर्ष आणि स्वाभिमान असलेल्या डॅशिंग लव्हस्टोरीचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला !

===========================

निर्मात्यांनीदेखील हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यात नक्कीच यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी कलाकारांनीही आपल्या भूमिकांबाबतचे अनुभव आणि तयारीबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. चित्रपटात मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार, विराजस कुलकर्णी, प्रसन्न केतकर यांच्यासह अनेक नामवंत कलाकार झळकणार आहेत. ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाचं जागतिक वितरण पॅनोरमा स्टुडिओज करणार असून, शिवरायांच्या पराक्रमाची ही गाथा प्रेक्षकांच्या मनावर नक्कीच खोल ठसा उमटवेल.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!