Skip to content Skip to sidebar Skip to footer

Movie Review : नावाप्रमाणेच Super Duper चित्रपट!

मराठी सिनेमातला फॅमिली ड्रामा म्हणजे एंटरटेनमेंटची भन्नाट राईडच! त्यात Super Duper चित्रपटाने तर नावाप्रमाणेच कमाल केली आहे. दोन विचारांच्या लोकांची झुंबड एकाच घरासाठी उडते तेव्हा काय लेव्हलचा राडा होतो, हाच या मूव्हीचा प्लस पॉइंट आहे… पण यासोबतच नात्यांमधल्या भावनिक घटनासुद्धा या चित्रपटाने कॅप्चर केल्या आहेत. चला मग बघूया समीर पाटील दिग्दर्शित सुपर डुपर चित्रपट नेमका कसा आहे…

आधी जाणून घेऊयात चित्रपटाचा इंटरेस्टिंग प्लॉट. तर रोहित म्हणजेच Lalit Prabhakar आणि इशा म्हणजेच Vidula Chaoghule  यांचं आधुनिक असं यंग, DASHING, DYNAMIC कपल. कामासोबतच पार्ट्या आणि CHILL करणं दोघांचं चालूच असत.. पण कुठेतरी STABLE व्हावं यासाठी आधार म्हणून एक FLAT विकत घेतात.. नवीन घर… नवीन आयुष्य सगळं कसं सुरळीत! पण तेवढ्यात त्यांच्या आयुष्यात एक जाधव कुटुंबाची एन्ट्री होते आणि इथेच येतो मोठा ट्विस्ट…

तर हे तसं ग्रामीण भागातलं कुटुंब आणि आपली तीच परंपरा शहरात घेऊन येतं. आता जाधव FAMILY येते म्हणजे काय तर जो FLAT रोहित आणि इशाला विकलेला असतो तोच FLAT जाधव फॅमेलीला सुद्धा विकलेला अंसतो. इथे सुरु होते पोलीस, कोर्ट केस आणि कॉमेडीचे CLASH… मग एकाच घरात दोन्ही कुटुंबांना नाईलाजाने राहावं लागतं, आणि मग सुरु होतात वाद… आता त्यांच्यातील नातं पुढे काय वळण घेतं हे पाहायला तुम्हाला थिएटरमध्ये जावंच लागेल..

चित्रपटाची कथा जाणून घेत्यानंतर आता जरा कास्टिंगकडे वळूयात…पुन्हा तेच म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही की चित्रपटाच्या नावाप्रमाणेच प्रत्येकाने सुपर अभिनय केला आहे. अभिनयाच्या क्षेत्रात ३० वर्षांपेक्षा अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या निर्मिती सावंत यांची भूमिका जरा जास्तच भन्नाट आहे. त्यांच्या तोंडून हटके शिव्या ऐकणं आणि नंतर त्यांच्याच तोंडातून भावनिक संवाद ऐकणं ही एक वेगळीच पर्वण आहे.… लोकांचे वेगळे स्वभाव आणि कमाल जुगलबंदी प्रेक्षकांना नक्कीच यात पाहायला मिळते.

आता जरा लीड कॅरेक्टर्सकडे वळूयात… ललित आणि विदुला… मराठीतील ही फ्रेश जोडी परफेक्ट जमली आहे. खासकरून ललितने गेल्या काही चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाने वेगळीच छाप प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे. विदुलानेही एका भांडखोर मुलीचं परफेक्ट कॅरेक्टर संपूर्ण चित्रपटात Carry केलं आहे. त्यांच्या व्यतिरिक्त कुशल बद्रिके, नम्रता संभेराव, ऋषिकेश जोशी, शशांक शेंडे, प्रतीक्षा कोटे यांची कामंही उल्लेखनीय आहेत. प्रत्येकाचे कॉमेडी पंचेस चित्रपटाला चार चांद लावतात. याशिवाय काही खास कलाकारांचा यामध्ये CAMEO सुद्धा आहे, जो तुम्ही मुव्हीमध्ये बघालच… एकंदरीत सगळ्यांचच काम इतकं सुंदर आहे की, मुव्ही कंटाळवाणा वाटत नाही. फक्त काही ठिकाणी गोष्टी उगाच ताणल्यासारख्या वाटतात आणि काही वेळापूरता चित्रपट रटाळ होतो. पण मराठी मुव्ही आणि त्यात FAMILY ड्रामा म्हटलं तर आपला हात कुणीच धरू शकत नाही हे पुन्हा या चित्रपटाने सिद्ध केलं आहे.

म्युझिकबद्दल बोलायचं झालं, तर गाणी उत्तमच आहेत. अभिनय जगताप आणि कुणाल करण यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. ‘नाचा दणाना’, ‘कुकुडू कु’ आणि ‘सुट्टा रोल’ ही गाणी भन्नाट आहेत आणि तिन्ही गाणी दिग्दर्शक समीर पाटील यांनीच लिहिलेली आहेत. काही ठिकाणी BACKGROUND स्कोर DULL वाटतो. पण कॉमेडीच्या ओघात आपण ते स्किप करू शकतो. डिरेकटर समीर पाटील यांनी केलेला हा अचानक कमबॅक खरंच सुपर डुपर ठरला आहे. कॉमेडी आणि इमोशन यांचा सुंदर समतोल साधण्यात ते यशस्वी ठरले आहेत. एकंदरीत काय तर रोहित-इशाची धमाल केमिस्ट्री, जाधव कुटुंबाचा गोंधळ टआणि त्यांच्यातच्या वादाची आणि भावनांची योग्य सांगड या ‘सुपर डुपर’मध्ये घातलेली आहे.

================================

हे देखील वाचा : Ramayana : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम आले भेटीला!

================================

“झाड उगायला माती आणि माणूस जगायला नाती लागतातच.” अशी काही भावनिक डायलॉग्ज आहेत, हे तुम्हाला नक्कीच चित्रपटाच्या प्रेमात पाडतील.  यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी ही मनोरंजनाची जबरदस्त मेजवानी आहे, ती मिस करू नका. माहितीये तुम्ही धुरंधर पाहिलाच असेल. पण आता आपल्या सुपर-डुपरकडेही वळा. कलाकृती मीडिया सुपर-डुपरला देत आहे पाच पैकी चार स्टार्स !

-सागर जाधव

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!