
Ranbir Kapoor : “मी प्रभू श्री राम यांच्या भूमिकेला न्याय…”
Dhurandhar : The Revenge चित्रपटानंतर आता नितेश तिवारीच्या Ramayana चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. आणि आज २ एप्रिल हनुमान जयंतीदिनी रामायण चित्रपटातील प्रभू श्रीराम यांची पहिली झलक जगभरात रिलीज करण्यात आली. Ranbir Kapoor याला रामाच्या भूमिकेत पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. परंतु, तुम्हाला माहित आहे का आधी या भूमिकेसाठी रणबीर कपूर याने नकार दिला होता. काय होतं नेमकं कारण जाणून घेऊयात… ‘रामायण’ चित्रपटात रणबीरने प्रभू श्रीराम साकारण्यास नकार दिला होता. आणि याचं कारण त्यानेच स्वत: नुकत्याच परदेशात झालेल्या एका कार्यक्रमात दिलं.
रणबीर म्हणाला की, “मी आधी रामानंद सागर यांचं Ramayana पाहिलं. ही मालिका सर्वांच्याच जवळची आहे. प्रभू श्रीराम यांचा जीवन प्रवास आणि संपूर्ण रामायण कथा यावर आपल्याला गर्व आहेच. मला पहिल्यांदा या भूमिकेसाठी ऑफर आली तेव्हा साहजिकच यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार याचा अंदाज आलाच होता. आणि श्रीराम साकारायचे म्हणजे केवळ शारिरिक नाही तर मानसिक तयाही देखील तितकीच करावी लागणार होती. सगळं समजून घ्यावं लागणार होतं आणि कायम खरं राहायचं होतं. मी सुरुवातीला या भूमिकेला नकार दिला होता. मला आठवतंय ४ वर्षांपूर्वी जेव्हा निर्माते नमित मल्होत्रा माझ्याकडे ऑफर घेऊन आले होते तेव्हा मी लगेच नकार दिला होता. मी यासाठी फिट नाही आणि या भूमिकेला न्याय देऊ शकणार नाही असं मी सांगितलं.” (Ranbir Kapoor rejected Ramayana movie)

रणबीरने पुढे याबद्दल अधिक सांगताना असं म्हटलं की, “मात्र Raha हिच्या जन्मानंतर माझ्यात खूप बदल झाला. सिनेमा ऑफर झाला तेव्हाच राहाचा जन्माचा झाला. तिच्याकडे पाहून माझ्या भीतीचं कृतज्ञतेत रुपांतर झालं. असं वाटलं की हे माझ्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे. माझ्या आयुष्यातला तो असा टप्पा होता जेव्हा मला माझी लाईफस्टाईल पूर्णपणे बदलावी लागणार होती. मी पहिल्यांदा बाप झालो होतो. मला वाटतं हा सुंदर योगायोग होता जेव्हा लेकीच्या जन्मानंतर मला प्रभू श्रीरामाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. माझं आयुष्यच बदललं.” (Movies 2026)
दरम्यान, लॉस एंजलिसमधील त्याच कार्यक्रमात रणबीर असं देखील म्हणाला होता की “मी प्रभू श्री राम यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नाही, तर त्यांच्याकडून शिकण्यासाठी ही भूमिका केली आहे. त्यांच्यातील साधेपणा आणि शुद्धता अत्यंत दुर्मिळ असून त्यांचा प्रवास समजून घेत तो लोकांपर्यंत नम्रपणे पोहोचवण्याचा मी माझ्या अभिनयातून प्रयत्न केला आहे”. (Ranbir Kapoor As Rama)

रणबीर कपूरने जरी सुरुवातीला ही भूमिका नाकारली असली तरी आता रिलीज झालेल्या टीझरवरुन त्याने कैकपटीने ती भूमिका सत्यात उतरवण्यासाठी आणि तिला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला आहे हे दिसून येते. नमित मल्होत्रा निर्मित आणि नितेश तिवारी दिग्दर्शित Ramayana हा चित्रपट २ भागांमध्ये २०२६ आणि २०२७ मध्ये जगभरात रिलीज होणार आहे. आत्तापर्यंत कोणत्याच भारतीय चित्रपटाचं बजेट नव्हतं तितकं या एका पौराणिकपटाचं बजेट असणार आहे. 4000 Cr बजेट असणारा हा चित्रपट चौपट कमाई करत जगभराच नवा इतिहास रचेल असा अंदात वर्तवला जात आहे. (Ramayana Movie budget)
================================
हे देखील वाचा : पणजोबांची ९२ वर्षांची परंपरा Ranbir Kapoor पुढे चालवणार!
================================
‘रामायण’ या भव्य चित्रपटात श्री राम यांच्या भूमिकेत रणबीर कपूर, सीता मातेच्या भूमिकेत Sai Pallavi, रावणाच्या भूमिकेत Yash, लक्ष्मणाच्या भूमिकेत Ravi Dubey, हनुमानाच्या भूमिकेत Sunny Deol दिसणार आहे. तसेच, या कलाकारांव्यतिरिक्त चित्रपटात काजल अग्रवाल, लारा दत्त, विवेक ऑबरॉय, अजिंक्य देव आणि बऱ्याच कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत. विशेष म्हणजे ‘रामायण’ चित्रपटाच्या निमित्ताने साई पल्लवी आणि यश बॉलिवूडमध्ये डेब्यु करणार आहेत. (Ramayana movie cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi