
Gharoghari Matichya Chuli मालिकेत नवा ट्विस्ट; अभिनेत्री स्मिता शेवाळेची दमदार एन्ट्री !
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका घरोघरी मातीच्या चुली (Gharoghari Matichya Chuli) सध्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. सुरुवातीपासूनच कौटुंबिक नातेसंबंध, संघर्ष आणि भावनिक गुंतागुंत यामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या मालिकेने आता कथानकात एक मोठा ट्विस्ट आणला आहे. रणदिवे कुटुंबावर नियंत्रण ठेवणाऱ्या मायाचं खरं रूप उघड झाल्यानंतर संपूर्ण गोष्टीला नवं वळण मिळालं असून, घरातील वातावरण पूर्णपणे बदललं आहे. जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका या तिन्ही सुनांनी आता अन्यायाविरोधात आवाज उठवत मायाविरोधात उघडपणे लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या धाडसी पावलामुळे कथानक अधिक रोमहर्षक बनलं आहे. विशेष म्हणजे, या संघर्षाला आता कायदेशीर रूप मिळणार असून मालिकेत कोर्टरूम ड्रामाची दमदार एन्ट्री होणार आहे.(Gharoghari Matichya Chuli Serial)

या नव्या ट्रॅकमध्ये प्रेक्षकांना एक प्रभावी व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहे. तिच नाव असणार आहे गीतांजली सरंजामे. ही भूमिका साकारणार आहेत अनुभवी अभिनेत्री स्मिता शेवाळे (Actress Smita Shewale). मराठी रंगभूमी आणि टेलिव्हिजन क्षेत्रात आपल्या अभिनयाने ठसा उमटवलेल्या स्मिता शेवाळे यांनी अनेक मालिकांमधून वेगवेगळ्या छटांच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयातली सहजता आणि दमदार संवादफेक ही त्यांची खास ओळख आहे.

मालिकेत त्यांची एण्ट्री एक अत्यंत बुद्धिमान, आत्मविश्वासू आणि अनुभवी वकील म्हणून होणार आहे. गीतांजली सरंजामे ही अशी वकील आहे, जिला आपल्या करिअरमध्ये एकही केस हरवण्याचा अनुभव नाही. कोर्टात तिची उपस्थितीच विरोधकांसाठी तणाव निर्माण करणारी ठरते. मायाची बाजू मांडण्यासाठी ती आता मैदानात उतरणार असून, जानकीच्या बाजूने लढणाऱ्या अवंतिकासोबत तिची थेट टक्कर रंगणार आहे. या कोर्टरूम ट्रॅकमुळे मालिकेत नवा थरार आणि ताणतणाव निर्माण होणार आहे. आतापर्यंत घराच्या चार भिंतीत सुरू असलेला संघर्ष आता न्यायालयात पोहोचल्याने प्रेक्षकांना वेगळाच अनुभव मिळणार आहे. प्रत्येक सीनमध्ये युक्तिवाद, पुरावे आणि भावनिक क्षण यांचा मिलाफ पाहायला मिळणार आहे.(Gharoghari Matichya Chuli Serial)
============================
हे देखील वाचा: Nandita Patkar ने गुपचूप उरकल दूसर लग्न; दिग्दर्शक विपुल महागावकरशी बांधली लग्नगाठ…
============================
एकंदरीत, ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका आता अधिक रंजक आणि गुंतवून ठेवणारी बनली आहे. गीतांजली सरंजामेच्या एण्ट्रीमुळे कथानकाला नवी धार मिळणार असून, या संघर्षात अखेर विजय कुणाचा होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. ही रंगतदार लढत पाहण्यासाठी प्रेक्षकांनी ही मालिका दररोज रात्री १०.३० वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळेल.