Skip to content Skip to sidebar Skip to footer

मराठी सिनेमात नव्या ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’ची एन्ट्री; ‘Ghabadkund’ सिनेमा देणार थराराचा वेगळाच अनुभव!

मराठी चित्रपटसृष्टी गेल्या काही वर्षांत झपाट्याने बदलत आहे. एकेकाळी कौटुंबिक आणि वास्तववादी कथांपुरती मर्यादित असलेली ही इंडस्ट्री आता तांत्रिकदृष्ट्या प्रगत, प्रयोगशील आणि धाडसी विषय हाताळणारी बनली आहे. अशाच नव्या विचारसरणीचा प्रत्यय देणारा ‘घबाडकुंड’ (Ghabadkund) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यवतमाळचा प्रयोगशील दिग्दर्शक प्रीतम पाटील (Pritam S K Patil ) पुन्हा एकदा आपल्या हटके शैलीत काहीतरी वेगळं सादर करण्यासाठी सज्ज झाला आहे. शॉर्ट फिल्म्स, वेबसिरीज आणि ‘खिचिक’, ‘डॉक्टर डॉक्टर’, ‘ढिशक्यांव’ यांसारख्या चित्रपटांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर ‘अल्याड पल्याड’च्या यशानंतर आता तो ‘घबाडकुंड’मधून आणखी मोठा आणि थरारक प्रयोग करत आहे.(Ghabadkund Marathi Movie) 

Ghabadkund Marathi Movie Cinematic Universe
Ghabadkund Marathi Movie

मराठी सिनेमात ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’ ही संकल्पना जवळजवळ नवीच आहे. हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये ही पद्धत प्रेक्षकांना परिचित असली, तरी मराठीत अशा प्रकारचे विश्व उभारण्याचा प्रयत्न क्वचितच झाला आहे. ‘घबाडकुंड’च्या माध्यमातून ही संकल्पना मराठी प्रेक्षकांसमोर मांडण्याचा धाडसी प्रयत्न केला गेला आहे. खरंतर, मराठी सिनेमात नवनवीन प्रयोगांची परंपरा नवीन नाही. याआधी Mahesh Kothare यांनी त्यांच्या चित्रपटांमधून तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि वेगळ्या संकल्पनांचा वापर करत प्रेक्षकांना वेगळा सिनेमॅटिक अनुभव दिला होता. ‘झपाटलेला’सारख्या चित्रपटांमधून त्यांनी हॉरर आणि मनोरंजन यांचा संगम साधत प्रेक्षकांना एका नव्या दुनियेत नेलं. त्या परंपरेला पुढे नेत आजची नवी पिढी आणखी मोठ्या कॅनव्हासवर प्रयोग करताना दिसत आहे.

Ghabadkund Marathi Movie Cinematic Universe
Ghabadkund Marathi Movie

‘घबाडकुंड’ हा चित्रपट केवळ भयपट नाही, तर त्यात अॅक्शन, इमोशन आणि ड्रामाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळाच ‘फुल पॅकेज’ अनुभव देणार आहे. या चित्रपटाची निर्मिती Icon The Style या संस्थेतर्फे करण्यात आली असून, निर्माते डॉ. रसिका कदम (Dr Rasik Kadam) यांनी या प्रकल्पाला पाठबळ दिलं आहे. दिग्दर्शक प्रीतम पाटील यांच्या मते, मराठी प्रेक्षकांना आता केवळ कथा नव्हे, तर तांत्रिकदृष्ट्या समृद्ध आणि थरारक अनुभव हवा आहे. त्यामुळेच त्यांनी हॉरर या जॉनरला वेगळ्या पद्धतीने हाताळत त्यात अॅक्शन आणि भावनिक बाजूही जोडण्याचा प्रयत्न केला आहे.(Ghabadkund Marathi Movie) 

============================

हे देखील वाचा: Tumbadchi Manjula Teaser: मध्यरात्री ‘ती’दारावर येते आणि…‘तुंबाडची मंजुळा’च्या थरारत टीझरने वाढवली उत्सुकता

============================

आजच्या काळात प्रेक्षकांचा कल मोठ्या स्केलच्या, व्हिज्युअली स्ट्रॉंग आणि थरारक चित्रपटांकडे वाढताना दिसतो. अनेकदा अशा अनुभवासाठी प्रेक्षक हिंदी किंवा हॉलिवूड चित्रपटांकडे वळतात. मात्र ‘घबाडकुंड’सारखे प्रोजेक्ट्स मराठी सिनेमालाही त्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. एकंदरीत, ‘घबाडकुंड’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक नवा टप्पा ठरू शकतो. गूढ, भय आणि सिनेमॅटिक स्केलचा अनोखा संगम असलेला हा चित्रपट येत्या १९ जून २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना एक वेगळाच थरार अनुभवायला मिळणार आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!