Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tumbadchi Manjula Teaser: मध्यरात्री ‘ती’दारावर येते आणि…‘तुंबाडची मंजुळा’च्या थरारत टीझरने वाढवली उत्सुकता

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका वेगळ्याच विषयाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. नावातच गूढता असलेला ‘तुंबाडची मंजुळा’ (Tumbadchi Manjula) हा चित्रपट आपल्या पहिल्याच पोस्टरपासून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होता. आता या चित्रपटाचा टीझर समोर आला असून, त्याने उत्सुकतेला आणखी खतपाणी घातलं आहे. टीझरची सुरुवातच एका गूढ वातावरणाने होते, जिथे ‘मंजुळा’ या नावाभोवती निर्माण झालेलं रहस्य आणि गावकऱ्यांच्या मनात दडलेली भीती स्पष्टपणे जाणवते. कोकणातील एका गावाची पार्श्वभूमी, तिथली माणसं आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या अनाकलनीय घटनांचा वेध घेणारी ही कथा असल्याचे संकेत या टीझरमधून मिळतात.(Tumbadchi Manjula Teaser)

Tumbadchi Manjula Trailer
Tumbadchi Manjula Teaser

या चित्रपटात कलाकारांची तगडी फळी पाहायला मिळणार आहे. जितेंद्र जोशी (Jitendra Joshi), ओम भुतकर( Om Bhutkar), मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure), अंशुमन विचारे (Anshuman Vichare) यांच्यासह अनेक दमदार कलाकार या कथेला वेगळ्या उंचीवर घेऊन जाताना दिसतात. विशेषतः भविष्य सांगणाऱ्या गुरुजीच्या भूमिकेत दिसणाऱ्या मकरंद अनासपुरे यांचा लूक आणि संवाद शैली प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. याशिवाय योगेश शिरसाट, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, अथर्व रुके आणि प्रियल नाईकयांच्याही भूमिका या कथेला अधिक रंगतदार बनवणार आहेत. अनुभवी अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांची उपस्थितीही चित्रपटाला अधिक बळ देणारी ठरणार आहे. मात्र, टीझरच्या शेवटी दिसणारी एक झलक सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते. अर्धवट उघड्या दरवाजामागे उभी असलेली सई ताम्हणकर (Sai Tamhankar). तिची ही रहस्यमय एन्ट्री प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करते.

Tumbadchi Manjula Trailer
Tumbadchi Manjula Teaser

या चित्रपटाविषयी बोलताना Bavesh Janavlekar (बवेश जानवलेकर) यांनी सांगितलं की, “ यापूर्वी प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरला मिळालेला प्रचंड प्रतिसाद बघता या टीझरमधून प्रेक्षकांची उत्सुकता कशी वाढेल यावर आम्ही भर दिला. आता प्रदर्शित झालेल्या टिझरमधून दिसणारी कलाकारांची फौज, त्यांचे धमाल संवाद हे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. मुळात कोकण प्रांत आणि कोकणातील लोकांच्या गजाली हा कायमच आपल्या आवडीचा विषय असतो. कोकणातील अशाच एका गावाची, त्यातील गावकऱ्यांची आणि गावात घडणाऱ्या एका अद्भुत घटनेची गोष्ट म्हणजे तुंबाडची मंजुळा हा चित्रपट. सर्वच स्तरांतील, वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल आणि सहकुटुंब बघता येईल असा हा मनोरंजक चित्रपट झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक वर्षानंतर झी स्टुडिओजने पूर्णपणे निर्मितीची धुरा सांभाळली आहे याचा आनंद आहे. ” (Tumbadchi Manjula Teaser)

===============================

हे देखील वाचा: ‘पारू’मालिकेतील जोडी आता करणार ‘स्पायगिरी’! विजय पटवर्धन आणि मुग्धा कर्णिक ‘Carry On Spygiri’ मध्ये एकत्र !

===============================

या चित्रपटाचं लेखन ऋषिकेश तुरई (Rishikesh Ture) यांनी केलं असून दिग्दर्शन विविध कोरगांवकर (Vividh Korgaonkar) यांनी केलं आहे. निर्मिती उमेश कुमार बन्सल (Umesh Kumar Bansal) आणि बवेश जानवलेकर यांनी केली आहे. एकंदरीत, ‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपट गूढ, भीती, विनोद आणि ग्रामीण पार्श्वभूमी यांचा अनोखा संगम घेऊन येत आहे. येत्या ५ जून २०२६ रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळाच सिनेमॅटिक अनुभव देईल, अशी अपेक्षा आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!