
बिग बॉसच्या घरातील ‘या’ सदस्याला Shiv Thakare याने केला सपोर्ट
मराठी बिग बॉसचं सहावं पर्व (Big Boss Marathi Seson 6) आता अंतिम टप्प्यात आलं आहे. घरातील प्रत्येक सदस्य बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी लढत आहेत. घरातील कंटेस्टंट्सना घराबाहेरील त्यांचे चाहते आणि सेलिब्रिटी सपोर्ट करत आहेत. अशातच आता बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता Shiv Thakare याने Big Boss Marathi Season 6 मधील त्याच्या फेव्हरेट स्पर्धकाला जाहिर पाठिंबा दर्शवला आहे. आणि तो आहे Vishal Kotian. नेमकं शिव काय म्हणाला आहे चला जाणून घेऊयात…(Entertainment News)
नुकताच तो The 50 या शो चा विजेता ठरला. आणि आता त्याने बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनबद्दल भाष्य केलं आहे. शिव म्हणाला की, “मी सध्या खरंच शो फॉलो करू शकलो नाही. कारण मी The 50 Show मध्ये होतो. मी क्लीप्स बघतोय, शो चांगला सुरू आहे आणि चांगला टीआरपी आहे. मला असं वाटतं की ज्या शोनं मला बनवलं आहे. तो शो जेव्हा हिट होतो तेव्हा अभिमान वाटतो की चला बिग बॉस मराठी चांगलं सुरू आहे. त्यात जो विशाल कोटियन आहे तो माझा खूप चांगला मित्र आहे. त्याच्या गेमबद्दल विचाराल तर तो मी पाहिलेला नाहीये. पण तो माझा मित्र आहे त्यामुळे जर मला पाठिंबा द्यायचा असेल तर मी त्याला करेन.” (Shiv Thakare News)

मराठमोळ्या शिव ठाकरे याने मराठीत तर आपला जम बसवला आहेच, परतुं, हिंदीतही Reality शो मधला तो किंग झाला आहे. मराठी बिग बॉसचा विनर झाल्यानंतर शिव बिग बॉस हिंदीच्या १६व्या सीझनमध्ये गेला होता आणि तिथे तो 1st runner up ठरला होता. एकीकडे Reality Show मधून तो प्रेक्षकांचं मनोरंजन तर करतोय, पण दुसरीकडे म्युझिक अल्बम्समधूनही तो पुढे येताना दिसतोय. बरं या सगळ्यात तो कुठेच चित्रपटात न दिसल्यामुळे त्याला संधी मिळत नाहीये असा प्रश्न सगळ्यांनाच निर्माण झाला आहे. परंतु, लवकरच तो या सगळ्या शंकांचं निरसन करेन अशी त्याच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.

तर, शिव ठाकरेने ज्याला सपोर्ट केला आहे त्या Vishal Kotian याच्याबद्दल जरा जाणून घेऊयात… विशाल मॉडेल आणि अभिनेता आहे. चित्रपटांसह टेलिव्हिजनमध्येही त्याने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. ‘बिरबल’, ‘हर मुश्किल का हल अकबर बिरबल’ आणि ‘अकबर का बल बिरबल’ अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये तो झळकला आहे. एकीकडे अभिनेता म्हणून आपलं करिअर सेट करत असताना दुसरीकडे Hindi Big Boss Season 15 व्या सीझनचा स्पर्धक होता. आणि आता मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनमध्ये तो आपला परफेक्ट गेम खेळताना दिसतोय. (Hindi Reality Show)
================================
हे देखील वाचा : Big Boss Marathi Season 6 : तन्वी आणि विशाल फायनलिस्ट आहेत का?
================================
विशालने ‘महाभारत’, CID, ‘ऐसा देश है मेरा’, ‘मैत्री’, ‘देवों के देव महादेव’, ‘फॅमेली नं 1’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘श्री आदि’ मानव अशा २० पेक्षा अधिक सिरीयल्समध्ये त्याने कामं केली आहेत. या शिवाय The Deadly Disciple आणि Don Muthu Swami या चित्रपटांत तो दिसला आहे. आता बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचा तो विजेता होणार का? Reality Show चा अनुभव आणि स्ट्रेटजीचा त्याला फायदा होणार का हे पाहणं आता फार महत्वाचं असणार आहे. (Big Boss)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi