Skip to content Skip to sidebar Skip to footer

“सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच…”,Ranbir Kapoor स्पष्टच बोलला!

कॉमेडी, ऐतिहासिक, बायोपिक्स अशा वेगवेगळ्या आशयांचे चित्रपट प्रेक्षकांना भावतातच. परतुं, ‘रामायण’, महाभारतावर आधारित कलाकृतींची प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा असते. आणि सध्या तोच धागा नितेश तिवारी यांनी अचुक पकडून Ramayana हा चित्रपट प्रेक्षकांच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच हनुमान जयंतीच्या निमित्ताने चित्रपटाचा टीझर ज्यात प्रभू श्रीरामाच्या भूमिकेतील Ranbir Kapoor याचा पहिला लूक रिलीज करण्यात आला. प्रेक्षकांनी रणबीरला रामाच्या रुपात स्वीकारलं असून आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता अधिक शिगेला पोहोचली आहे. लोकांनी रणबीरला Accept केलं असलं तरी काही जणांना साई पल्लवी सीता माता का? असा प्रश्न पडला आहे. याचं उत्तर रणबीरने एका कार्यक्रमात दिलं आहे. काय म्हणाला तो जाणून घेऊयात… (Ramayana Teaser)

भारतात रणबीरचा लूक रिलीज करण्याआधी लॉस एंजलिसमध्ये एका कार्यक्रमात करण्यात आला होता. यावेळी Sai Pallavi हिला पहिल्यांदा सीता मातेच्या भूमिकेत पाहून रणबीरची काय प्रतिक्रिया होती हे त्यानेच सांगितलं आहे. सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच योग्य आहे असं रणबीर म्हणाला. “आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की साई किती अप्रतिम अभिनेत्री आहे. आणि तिने आपल्या अभिनयातून यश संपादन केलं आहे. पहिल्याच दिवशी, जेव्हा मी तिला सीतेच्या रूपात पाहिलं, तेव्हा मी फक्त नितेश सरांकडे पाहिलं आणि आम्हा दोघांनाही लगेच जाणवलं की या भूमिकेसाठी तिच्यापेक्षा योग्य चेहरा दुसरा कोणताही असू शकत नाही“, अशा भावना रणबीरने व्यक्त केल्या. (Mythological movies)

यावेळी रणबीरने साई पल्लवीचं कौतुक तर केलंच पण रावणाच्या भूमिकेतील Yash याचाही उल्लेख त्याने केला. “रावणाचं पात्र साकारण्यासाठी जे स्टारडम किंवा जो प्रेझेंस हवा होता तो यश कडे नक्कीच आहे. आणि रावणाच्या भूमिकेत तो परफेक्ट फिट बसला आहे”. आता रणबीरने आपलं मत तर दिलं आहे. मात्र, ज्यावेळी Ramayana चित्रपट रिलीज होईल आणि त्यात यश आणि साई पल्लवीचा लोकं अभिनय पाहतील त्यावेळी त्यांची त्या त्या भूमिकेसाठी निवड योग्य होती का यावर खरा शिक्का बसेल. (Celebrity & Entertainment News)

दरम्यान, साई पल्लवी हिच्याबद्दल बोलायचं झालं तर, पेशाने ती डॉक्टर आहे. MBBS करत असतानाच तिला Premam चित्रपटाची ऑफर आली. तिने तो चित्रपट स्वीकारला आणि पहिल्याच चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. यानंतर शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता तिने फिल्मी क्षेत्रात आपलं करिअरही सुरुच ठेवलं. ‘मारी २’, ‘दिल धडक धडक’, ‘Athiran’, ‘जुलै १५’, ‘Amaran’ अशा अनेक चित्रपटांत तिने उल्लेखनीय कामं केली आहेत. (Sai Pallavi Movies)

================================

हे देखील वाचा : Ranbir Kapoor : “मी प्रभू श्री राम यांच्या भूमिकेला न्याय…”

================================

तसेच, साई पल्लवी हिची एक खासियत आहे आणि ती म्हणजे इतर नटींप्रमाणे तिला मेकअप करायला आवडत नाही. मोठ्या स्क्रिनवरही जितकं नॅचरल राहता येईल तितकं की राहून आपल्या आभिनयातून टॅलेंट सिद्ध करते. तिच्यासोबत एक जाहिरातीचा किस्सा झाला होता. तो असा की तिला एका फेसक्रिमच्या अॅडसाठी विचारणा झाली. परंतु, “माझा भारतीय रंग आहे आणि त्याचा मला अभिमान व गर्व असल्यामुळे मी ही अॅड करणार नाही”, असं स्पष्टपणे उत्तर देत तिने २ कोटींची ऑफर नाकारली होती. त्यामुळे चंदेरी जगातही आपल्या मतांवर ठाम राहणाऱ्या फार कमी कलाकारांपैकी साई पल्लवीचं नाव घ्यायलाच हवं. बाकी 400 Cr चं बजेट असणारा ‘रामायण’ हा साई पल्लवीचा Bollywood Debut चित्रपट किती हिट ठरणार हे पाहण्यासाठी दिवाळी २०२६ ची वाट पाहावी लागणार आहे. (Ramayana Release 2026 & 2027)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!