Skip to content Skip to sidebar Skip to footer

Mi Jinkun Ghein Saare New Marathi Serial: छवी आणि ‘बाई-आजी’च्या अतूट नात्याची कथा ‘मी जिंकून घेईन सारं’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !

नात्यांच्या गुंतागुंतीवर आणि त्यातून उमटणाऱ्या प्रेमावर आधारित नवी मराठी मालिका ‘मी जिंकून घेईन सारं’(Mi Jinkun Ghein Saar)  लवकरच कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेची कथा आपल्या नात्यांपेक्षा कधी कधी जोडल्या गेलेल्या नात्यांतील जिद्द, प्रेम आणि साथ यावर भर देते. मालिकेतील मुख्य पात्र छवीची भूमिका जान्हवी तांबट साकारणार असून, तिच्या आयुष्यातील नात्यांमध्ये ‘बाई-आजी’चं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. छवीसाठी बाई-आजी म्हणजे देवासमान, जरी रक्ताचं नातं नसले तरी ती तिला खंबीर आधार देणारी आहे. राजगुरू कुटुंबाचा डोलारा असलेली बाई-आजी घराचा पाया आहेत. या कुटुंबाला छवी खंबीरपणे सांभाळत असतानाच, तिच्या समोर अनेक अडचणी उभ्या राहणार आहेत. या अडचणींमध्ये कुटुंबातील एक चाणाक्ष आणि धूर्त मुलगी शांभवी देखील आहे, जिने राजगुरू कुटुंबावर संकट उभं करणारा डाव आखला आहे. छवी या साऱ्या संकटांना कशी सामोरी जाते, कुटुंबासाठी कोणती किंमत मोजते, हे पुढच्या भागांमध्ये पाहायला मिळेल.(Mi Jinkun Ghein Saare New Marathi Serial)

Mi Jinkun Ghein Saare New Marathi Serial
Mi Jinkun Ghein Saare New Marathi Serial

भारती आचरेकर (Actresss Bhakti Acharekar) यांची ‘बाई-आजी’ ही भूमिका पहिल्यांदाच मराठी मालिकेत पाहायला मिळणार आहे. त्यांच्या ठाम पण मोकळ्या विचारांच्या आजीच्या भूमिकेमुळे मालिकेला एक वेगळा आकर्षण मिळणार आहे. भारती आचरेकर या पात्रामुळे कथेला गंभीर पण सजीव रूप मिळालं आहे. त्यांच्यासोबत जान्हवी तांबटची छवी भूमिका देखील प्रेक्षकांच्या मनात घर करेल अशी अपेक्षा आहे.

Mi Jinkun Ghein Saare New Marathi Serial
Mi Jinkun Ghein Saare New Marathi Serial

कलर्स मराठीच्या एग्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट सतीश राजवाडे म्हणतात की, “ही मालिका नात्यांच्या संघर्षांवर आधारित असून संपूर्ण कुटुंबाने एकत्र बघता येईल. छवीची कथा जिद्दीची आहे, जी आयुष्याच्या प्रत्येक लढाईत जिंकण्यावर विश्वास ठेवते. ‘बाई-आजी’ ही तिचा आधार आहे, ज्यामुळे ती खंबीर उभी राहते.”(Mi Jinkun Ghein Saare New Marathi Serial)

======================================

हे देखील वाचा: Yed Lagal Premach मालिकेत मोठा बदल; जीजीची होणार एक्झिट आणि ‘या’ प्रसिद्द अभिनेत्रीची होणार एंट्री !

======================================

मालिकेतील बबी आत्या आणि इतर पात्रांच्या उपस्थितीमुळे कथेला अधिक धार मिळेल. टीझरमध्ये बाई-आजी आणि छवीचं नातं, तसेच कुटुंबातील संघर्षाची झलक पाहायला मिळते, ज्यामुळे प्रेक्षकांत उत्सुकता वाढली आहे. ‘मी जिंकून घेईन सारं’ ही मालिका १६ मार्चपासून संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होईल. नात्यांच्या जिवंत संघर्षावर आधारित आणि प्रेमाच्या अनमोल नात्यांवर प्रकाश टाकणारी ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच भावेल.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!