Skip to content Skip to sidebar Skip to footer

अखेर ‘Deool Band 2’ ची तारीख ठरली; ‘आता परीक्षा देवाची’ उपशीर्षकाने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

मराठी चित्रपटसृष्टीतील एक वेगळा ठसा उमटवणारा ‘देऊळ बंद’ (Deool Band Movie) हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात ताजा आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांचा अनोखा संगम दाखवणाऱ्या या चित्रपटाने २०१५ साली प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडलं होतं. या यशानंतर दुसऱ्या भागाची मागणी सातत्याने होत होती आणि अखेर त्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे. ‘देऊळ बंद २’ (Deool Band 2 ) या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, त्याचं डिजिटल पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं आहे. (Deool Band 2)

Deool Band 2 Pravin Tarade
Deool Band 2 Date

या नव्या भागात कथा कोणत्या दिशेने पुढे जाणार, याची उत्सुकता आधीच निर्माण झाली आहे. ‘आता परीक्षा देवाची’ हा उपशीर्षक विशेष लक्ष वेधून घेत आहे. यामुळे या वेळेस कथानक अधिक गूढ, तत्त्वज्ञानात्मक आणि विचारप्रवर्तक असणार, अशी चर्चा रंगली आहे. देव आणि विज्ञान यांच्यातील नातं पुन्हा एकदा नव्या पद्धतीने उलगडताना दिसणार का? हा प्रश्नही प्रेक्षकांच्या मनात आहे.

Deool Band 2 Pravin Tarde
Deool Band 2 Date

या चित्रपटामागे उभं असलेलं नाव म्हणजे लेखक-दिग्दर्शक प्रवीण विट्ठल तरडे (Pravin Vitthal Tarde). त्यांनी आतापर्यंत दिलेले चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहेत. मुळशी पॅटर्न (Mulshi Pattern), सरसेनापती हंबीरराव (Sarsenapati Hambirrao), धर्मवीर (Dharmaveer), धर्मवीर २ (Dharmaveer 2) यांसारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे ‘देऊळ बंद २’कडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. सध्या चित्रपटातील कलाकारांची नावं जाहीर करण्यात आलेली नाहीत, त्यामुळे त्याबाबत एक वेगळंच गूढ निर्माण झालं आहे. कोणते कलाकार या वेळी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार? आणि कथा कोणत्या नव्या वळणावर नेली जाणार? याबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये कायम आहे. (Deool Band 2)

===========================

हे देखील वाचा: Prajakta Mali ने घेतला मोठा निर्णय; दागिन्यांच्या ब्रँडचं नावच बदललं, व्हिडिओ पोस्ट करत सांगितले कारण 

===========================

वटवृक्ष एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार होणारा हा चित्रपट २१ मे २०२६ रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार आहे. निर्माते कैलाश वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी सूर्यवंशी यांनी या प्रकल्पाची धुरा सांभाळली आहे. एकूणच, ‘देऊळ बंद २’ हा केवळ सिक्वेल नसून, विचारांना चालना देणारा आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा अध्यात्म-विज्ञानाच्या संगमाचा अनुभव देणारा चित्रपट ठरणार आहे. आता ‘देवाची परीक्षा’ नेमकी कशी असणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!