Skip to content Skip to sidebar Skip to footer

Big Boss Marathi 6 : काटा- टोळी ग्रुपवर Double Eliminationची टांगती तलवार; प्रभूची एक्झिट कन्फर्म?

दिवसागणिक Big Boss Marathi Season 6 चं हे पर्व इंटरेस्टिंग होत चाललं आहे. वीक स्पर्धकांना घराबाहेर काढत सध्या घरात टॉप १० स्पर्धक आहेत. नुकताच या आठवड्यात फॅमेली वीक सेलिब्रेट झाला. आपल्या कुटुंबियांना (Family Week in big boss huse) बघून सदस्यांचे डोळे पाणावले. घरच्यांनी प्रत्येकाला त्यांनी कसा गेम अप करायला हवा याच्या सूचना दिल्या. पण या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर २ स्पर्धकांना त्यांचा गेम अप करण्याची संधी कदाचित मिळणार नाही. कारण, या आठवड्यात २ सदस्यांचा बिग बॉसच्या घरातला प्रवास संपणार आहे. आणि शॉकिंग ही बाब आहे की यात कदाचित काटा ग्रुपमधला प्रभू शेळकेचं (Prabhu Shelke) नाव आहे.

कलर्स मराठीने सोशल मिडियावर अकराव्या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्याची क्लिप शेअर केली आहे. यात रितेश देशमुखने घरातून २ सदस्य बाहेर पडणार असं सांगत एक काटा आणि टोळी मधले एक एक सदस्य असतील असं जाहिर केलं. प्रोमोमध्ये दिसून येत आहे की काटा ग्रुपमधील एकाचं नाव अनाऊन्स केल्यानंतर Tanvi Kolte ढसाढसा रडताना दिसत आहे. त्यामुळे सोशल मिडियावर सध्या छोटा डॉन अर्थात प्रभू शेळके याची एक्झिट झाल्याचं म्हटलं जात आहे. (Big Boss marathi double elimination)

Big Boss Marathi Season 6 च्या पहिल्या दिवसापासूनच घरातील सगळ्यात छोटा सदस्य म्हणून आपली ओळख असणारा प्रभू हा बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांपैकी एक स्ट्राँग कंटेस्टंट मानला जात होता. कॉमेडी करत त्याने प्रेक्षकांना हसवलं आणि घरातील भांडणांच्या मुद्द्यत आपली मतंही ठामपण मांडली. परंतु, कुठेतरी त्याचा गेम कमी पडला असं प्रेक्षकांना वाटल्यामुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच तन्वीच्या छत्र-छायेत प्रभू गेम खेळलाच नाही अशाही कमेंट्स लोकं करत आहेत. (Chota Don Prabhu Shelke)

तसेच, दुसरीकडे टोळी ग्रुपबद्दल बोलायचं झालं तर ओजी मेंमबर्स Vishal Kotian आणि Anushree Mane तर यात आहेतच पण संकेत पाठक, सागर कारंडे आणि राखी सावंत हे सदस्य दखील टोळीमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे या आठवड्यात टोळीमधला नेमका कोणता स्पर्धक बाहेर जाणार हा संभ्रम लोकांना आहे. कदाचित वाईल्ड कार्ड कंटेस्ट्ट Sanket Pathak ही असू शकतो किंवा गेल्या काही दिवसांमध्ये घरातील रुल्स ज्या पद्धतीने Rakhi Sawant हिने मोडले आहेत त्यामुळे कदाचित राखी सावंत देखील घराबाहेर जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. आज भाऊच्या धक्क्यावर प्रेक्षकांच्या शंकाचं निरसन होईल आणि दोन स्पर्धक जे घराबाहेर गेले आहेत त्यांनी नाव समजतील.

================================

हे देखील वाचा : Big Boss Marathi 6 : सागरने बायको आणि मुलीला पाहिलं की भूताला?

================================

विशेष म्हणजे बाराव्या आठवड्याच्या सुरुवातीला दुसऱ्यांदा कॅप्टन होण्याचा मान Tanvi Kolte हिला मिळाला आहे. आणि तेराव्या आठवड्यात थेट पोहोचणारी ती पहिली स्पर्धक ठरली आहे. सुरुवातीपासूनचा तन्वीचा ग्राफ पाहता नक्कीच ती टॉप ३ मध्ये असेल अशा कंमेट्स लोकं करत आहेत. त्यामुळे आचा बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचा विनर मुलगा असेल की मुलगी हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. (Big Boss Marathi season 6 Grand Finale coming soon)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!