Skip to content Skip to sidebar Skip to footer

Dhurandhar 2 मुळे सलमान खान आणि यश घाबरले?; मराठीचीही उडाली झोप?

तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने सगळंच जिंकून घेतलं… हो आपण बोलतोय Dhurandhar : The Revenge चित्रपटाबद्दल… २०२५ च्या डिसेंबरमध्ये या चित्रपटाने संपूर्ण बॉक्स ऑफिस काबिज केलं आणि आपलं लक्ष मार्च २०२६ वर केंद्रीत केलं. पहिल्या धुरंधरने Worldwide 1300Cr कमावले आणि नवा रेकॉर्ड सेट केला. आणि आता Dhurandhar 2 ने तर पहिल्याच आठवड्यात १००० कोटींची रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई करत २००० कोटींकडे वाटचाल सुरु केली आहे. पण या सगळ्याचा फटका मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटपटांनाही बसला आहे. ‘धुरंधर’च्या समोर कोणताच चित्रपट रिलीज होण्याची हिंमतच करत नाहीये. चला तर एक नजर टाकूयात इंडस्ट्रीवर…(Bollywood vs Marathi Movies)

Ranveer Singh याने बॉलिवूडच्या Khan’s ना ‘धुरंधर’ने पाणी पाजलं आहे… खरं तर एप्रिल महिन्यात Salman Khan याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित Maatrubhumi: May War Rest in Peace रिलीज होणार होता. प्रदर्शनाची तारीख ठरलेली १७ एप्रिल २०२६. परंतु, जसा १९ मार्च २०२६ ला ‘धुरंधर २’ रिलीज झाला तशी सलमानने तांत्रिक अडचण सांगत त्याच्या चित्रपटाची डेट बदलली. आता एप्रिलची तारीख जरी त्याने १४ ऑगस्ट २०२६ केली असली तरी त्यावेळी त्याच्या चित्रपटाचा क्लॅश Amir Khan आणि सनी देओल यांच्या Batwara 1947 या चित्रपटाशी होणार आहे. त्यामुळे बऱ्याच काळापासून फ्लॉप चित्रपट देणाऱ्या सलमानच्या झोळीत Battle Of Galwan हा देखील फ्लॉप मुव्ही म्हणून अॅड होणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. (Battrle of Galwan vs Batwara 1947)

बरं, हे झालं बॉलिवूडबद्दल… आता १९ मार्च २०२६ याच दिवशी रॉकिंग स्टार यश याचा Toxic : A Fairytale For Grown Ups हा चित्रपट रिलीज होणार होता. मात्र, जगभरात सुरु असलेल्या Middle East युद्धाच्या पार्श्वभूमीवर आम्ही रिलीज डेट पुढे ढकलत आहोत असं निवेदन टॉक्सिक चित्रपटाच्या टीमने सोशल मिडियावरुन पोस्ट केलं. त्यासोबतच नवी रिलीज डेट ४ जून २०२६ असल्याचं जाहिर केलं. आता जरी त्यांनी युद्धाचं कारण दिलं असलं तरी खऱ्या अर्थाने यशच्या चित्रपटाचं युद्ध बॉक्स ऑफिसवर रणवीरच्या ‘धुरंधर २’ सोबत होतं हे सत्य नाकारता येणारच नाही. (Dhurandhar 2 vs Toxic)

================================

हे देखील वाचा : Dhurandhar 2 नंतर Ramayana बॉलिवूडचा गेम चेंजर ठरणार?

================================

बॉलिवूड आणि साऊथनंतर आता जरा आपल्या मराठी चित्रपटांकडे वळूयात… सध्या मराठीत वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट येत आहेत. पण तरीही जितका मराठी नाटकांना प्रतिसाद मिळतोय तितका मराठी चित्रपटांना मिळच नाहीये ही दुर्दैवाने वस्तुस्थिती असून ती नाकारता येत नाही. आधीच मुंबईत किंवा महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची स्पर्धा हिंदी, साऊथ आणि हॉलिवूडसोबत असताना त्यात आता एकट्या ‘धुरंधर’ चित्रपटाने मराठी मेकर्सच्या नाकी नऊ आणले आहेत. २०२६ या वर्षांची सुरुवात हेमंत ढोमे यांच्या Krantijyoti Vidyalaya-Marathi Madhaym चित्रपटाने झाली होती. परंतु, त्यावेळी Dhurandhar ची क्रेझ असल्यामुळे क्रांतिज्योतीला फटका बसला होता… आताही ६ मार्चला Tighee हा चित्रपट रिलीज झाला पण या चित्रपटाला फारसे शो थिएटर्समध्ये मिळालेच नाहीत, कारम काय तर Dhurandhar : The Revenge चे सगळेच शो हाऊसफुल्ल…(Entertainment Lates News)

आता एप्रिलमध्ये ‘सुपर डूपर’, ‘सखे गं साजणी’ (Pooja Sawant) हे मराठी चित्रपट रिलीज होणार आहेत. पण सध्याची स्थिती पाहता ‘धुरंधर’मुळे या चित्रपटांच्या कलेक्शन आणि शोज् वर परिणाम होणार हे दिसून येत आहे. तसेच, १ मे २०२६ रोजी रितेश देशमुख याचा Raja Shivaji चित्रपट रिलीज होणार असून या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. त्यामुळे आता येत्या काळात मराठी चित्रपटांना आपलं स्थान भक्क करण्यासाठी एकत्रित येत ठोस पावलं उचलण्याची गरज आहे यात तिळमात्र शंका नाही. (Marathi Movies 2026)

तसेच, २०२६ मध्ये बरेच मोठे चित्रपट रिलीज होणार आहेत. यात नितेश तिवारीचा Ramayana चित्रपट आहे. ४००० कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटाचा पहिला भाग २०२६ च्या दिवाळीत रिलीज होणार आहे. या व्यतिरिक्त राजेश मापुस्कर दिग्दर्शित Chiranjeevi Hanuman – The Eternal, प्रियदर्शन दिग्दर्शित Bhoot Bangala, Dacoit, राम चरण याचा Peddi, Cocktail 2, Welcome To The Jungle, Alpha हे मोठे चित्रपटही रिलीज होणार आहेत. तर मराठीत येत्या काळात ‘सालबर्डी’, ‘तुंबाडची मंजुळा’, ‘फुला’, ‘महापरिनिर्वाण’, ‘घबाडकुंड’, ‘Mardini’ हे चित्रपट रिलीज होणार आहेत. आता कोणते चित्रपट बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!