Skip to content Skip to sidebar Skip to footer

Dhurandhar 2 :  दोन्ही पार्ट्समधून 1000 कोटींची कमाई करणारा पहिलाच चित्रपट!

आदित्य धर दिग्दर्शित Dhurandhar : The Revenge चित्रपटाने सगळेच रेकॉर्ड मोडून काढण्याचा विडा उचलला आहे. पहिल्याच दिवशी 102 Cr कमवत रेकॉर्डची सुरुवात केली होती. आणि त्यानंतर दर दिवशी थिएटरबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागण्याचा सपाटा सुरुच झाला. आता Ranveer Singh याच्या या चित्रपटाने अवघ्या ७ दिवसांत 1000 Cr पार करत बॉलिवूड आणि साऊथच्या चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे. (Dhurandhar 2 Box Office Collection)

‘Sacnilk’च्या माहितीनुसार, ‘धुरंधर: द रिव्हेंज’ने सातव्या दिवशी 47.70 Cr चं Net Collection केलं आहे. १९ मार्च २०२६ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत  भारतात एकूण 744.58 Cr (Gross) ७ आणि 623.42 Cr (Net) कलेक्शन केले आहे. तसेच, WorldWide Dhurandhar 2 नवा इतिहास रचत 1006.50 Cr इतकी कमाई केली आहे. (Dhurandhar 2 Cross 1000 cr worldwide)

आनंदाची बाब म्हणजे ‘धुरंधर २’ चित्रपटाने रणबीर कपूरच्या Animal (917 Cr), श्रद्धा कपूरच्या Stree 2 (857 Cr), विकी कौशलच्या Chhaava (807 Cr) ,ऋषभ शेट्टीच्या Kantara : A Legend-Chapter 1 (852 Cr) आणि सलमान खानच्या Bajrangi Bhaijan (918.18 Cr) या चित्रपटांच्या एकूण कमाईला फक्त एका आठवड्यात मागे टाकलं आहे. आणि धुरंधरचा स्पीड पाहता लवकरच हा चित्रपट Kalki 2898 AD (1042 Cr) आणि शाहरुख खानच्या Jawan (1160 Cr) या चित्रपटांना मागे टाकू शकतो. (Bollywood Movies)

तसेच, रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ आणि Allu Arjun अल्लू अर्जूनच्या Pushpa 2 च्या बॉक्स ऑफिस कमाईती तुलना केली असता रिलीजच्या सहाव्या दिवशी ‘धुरंधर’ने भारतात 545.04 Cr नेट कलेक्शन केलं आहे, तर पुष्पा २ ने 368.10 Cr चं नेट कलेक्शन केलं होतं.  इतकंच नाही तर, या चित्रपटाने रिलीजनंतर केवळ पाच दिवसांतच परदेशात सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत तिसरे स्थान मिळवलं आहे. ‘पुष्पा 2’ (2024) ने परदेशात 271 Cr ची कमाई केली होती, भारतात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट असलेल्या ‘RRR’ ने परदेशात 314 Cr कमावले होते; तर ‘KGF 2’ ने 214 Cr आणि ‘Kalki 2898 AD’ ने 275 Cr ची कमाई केली होती. (Dhurandhar 2 vs KGF 2)

================================

हे देखील वाचा : Dhurandhar 2 : “नाहीतर 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात माझाच मृत्यू…”; अर्जूनचा थरारक अनुभव

================================

Ranveer Singh बॉलिवूडमधला असा एक Under Rated अभिनेता होता ज्याने आपल्या कामाने खरंच लोकांना, मेकर्सना त्याची दखल घेण्यास भाग पाडलं आहे. ‘धुरंधर’ चित्रपटाबद्दल आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही पार्ट्समधून 1000 कोटींची कमाई करणारा हा इतिहासातील पहिलाच चित्रपट ठरला आहे. आता Dangal चित्रपटाचा २००० कोटींचा रेकॉर्ड मोडून काढत हा चित्रपट वर्ल्डवाईड 2500 Cr क्लबची सुरुवात करणार का याकडे आता सगळेच डोळे लावून बसले आहेत. (Dhurandhar 2 vs Dangal)

एकीकडे रणवीरच्या चित्रपटाची प्रशंसा सुरु असताना दुसरीकडे मात्र, Kantara : The Legend-Chapter 1 चित्रपटाबद्दलच्या विधानामुळे तो चांगलाच ट्रोल झाला आहे. ऋषभ शेट्टी याने साकारल्या भूमिकेची थट्टा केल्यामुळे आणि चामुंडी देवीचा अवमान केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला. आता लवकरच तो देवीच्या मंदिता जाऊन माफी मागणार असल्याची माहित समोर येत आहे. नेमकं हे प्रकरण आता कोणत्या वळणावर जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!