
Ranveer Singh : मंदिरात जावंच लागणार; ‘कांतारा’तील दैवांची नक्कल करणं पडलं महागात!
कोणत्या कारणामुळे सेलिब्रिटी ट्रोल होतील याचा अंदाज नाही. बऱ्याचदा नकळतपणे त्यांनी केलेली कृती एखाध्या धार्मिक किंवा सामाजिक घटकाचं मन दुखावून जातो. असंच काहीसं घडलं आहे Dhurandhar 2 फेम रणवीर सिंग याच्याकडून. २०२५ मध्ये आलेल्या Kantara : Chapter 1 चित्रपटातील ऋषभ शेट्टीच्या एका दृश्यात चामुंडी देवीची खिल्ली उडवल्याप्रकरणी त्याच्यावर समुदाय नाराज झाला होता. चामुंडी देवीचा केलेला अपमान त्याला पुरता महागात पडला अशून आता न्यायालयात माफीनाम्यासोबतच देवीच्या मंदिरात जाऊन रणवीर माफी मागणार असल्याची अपडेट समोर आली आहे.
दरम्यान, नुकतीच या प्रकरणाबद्दल कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. घडलेल्या प्रकाराबद्दल Ranveer Singh ने सोशल मिडियावरुन सगळ्यांची माफी देखील मागितली होती. परंतु, त्याच्या टीमकडून नाही तर त्याने स्वत: पोस्ट करणं अपेक्षित होतं अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, 24 मार्च रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान रणवीरचे वकील साजन पूवैय्या यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, “रणवीर माफी मागणारं प्रतिज्ञपत्र दाखल करणार असून क्षमा मागण्यासाठी तो मंदिरातही जाण्यास तयार आहे.” परंतु रणवीरची माफी ही वरवरची होती, ती प्रामाणिक नव्हती, असा आरोप तक्रारदाराच्या वकिलांनी केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. महत्वाचं म्हणजे Rishabh Shetty याने त्याच्या चित्रपटाचं प्रकरण कोर्टात सुरु असताना रणवीरचं ‘धुरंधर’च्या यशासाठी कौतुक करणारी पोस्ट सोशल मिडीयावर केली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
तर, 2025 मध्ये गोव्यात संपन्न झालेल्या International Film Festival (IFFI) महोत्सवात रणवीर ने ‘कांतारा: चॅप्टर 1’ चित्रपटातील ‘दैव’ परंपरेची नक्कल करत अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीच्या अभिनयाचीही नक्कल केली होती. मात्र, या सादरीकरणादरम्यान त्याने त्या पवित्र देवतेचा उल्लेख ‘स्त्री भूत’ असा केल्याने मोठा वाद निर्माण झाला. आणि लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे रणवीरवर गुन्हा दाखल करण्यात आला.

रणवीर सिंगच्या त्या वक्तव्यामुळे कर्नाटकसह देशभरातील अनेक हिंदू संघटना आणि भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या मते, ‘दैव’ ही परंपरा अत्यंत पवित्र आणि स्थानिक श्रद्धांशी निगडित असून तिचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात आला होता. आता पुढे हे प्रकरण काय वळण घेणार याकडे सगळ्या देशाचं नक्कीच लक्ष लागलं आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.
आता कांतारा चित्रपटाचा विषय निघाला आहेच तर यातील पंजुर्ली आणि गुलिगा या देवांबद्दल जरा माहिती जाणून घेऊयात… कांतारा चित्रपटातल्या वराह रुपम हे गाणं सध्या प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत झालं आहे… या गाण्यात उल्लेख केलेला वराह हा विष्णुचा अवतार आहे हे आपण जाणतोच… तसेच, कांतारा चित्रपटामध्ये दोन देव दाखवले आहेत… पंजुर्ली आणि गुलिगा … दक्षिणेत प्रामुख्याने कर्नाटकात पंजुर्ली देवाची पूजा केली जाते… पंजुर्ली देवाला जमीन आणि शेतीचं रक्षण करणारा देव मानलं जातं… सुख, समृद्धी आणि भरभराट यांचा आशीर्वाद पंजुर्ली देवाकडून मिळतो अशी दक्षिणेत मान्यता आहे… (Kantara : The Legend-Chapter 1)

तर, इतर काही कथांनुसार पंजुर्लीची वेशभुषा पाहिली तर लक्षात येतं की, पंजुर्लीच्या डोक्यावर जो मुकुट आहे त्याच्यावर वराह आहे. कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये पंजुर्लीची पूजा करत भूता कोला हा उत्सवही साजरा केला जातो. एका दंतकथेनुसार कैलास पर्वतावर पार्वती मातेला एक अनाथ डुकराचं पिल्लू भेटलं… पार्वतीला त्या पिल्लाची दया आली आणि तिने त्या पिल्लाला मांडीवर घेतलं आणि पंजुर्ली हे नाव त्याला दिलं. पंजुर्ली जंगलाचा रक्षक आहे असंही म्हटलं जातं… (Entertainment news)
================================
=================================
आता कांतारामध्ये उल्लेख केलेल्या गुलिगा देवाची निर्मिती कशी झाली? तर असं मानलं जातं की शंकराकडून गुलिगाची निर्मिती झाली आहे. भगवान शंकराने एक दगड फेकला त्यातून गुलिगा जन्माला आला असं मानलं जातं. गुलिगा हा उग्र देव आहे असं म्हटलं जातं.. तर, दक्षिण कर्नाटकातील संस्कृतीनुसार गुलिगाचा जन्म हा शंकरामुळे त्याच्या भस्मामुळे झाला आहे अशीही मान्यता आहे. दक्षिणेत सांगितल्या जाणाऱ्या एका दंतकथेनुसार देवी पार्वतीला भस्माचा एक विचित्र दगड दिसला. जेव्हा हा दगड पार्वतीने भगवान शंकराच्या हाती दिला तेव्हा त्यांनी तो दगड खाली फेकला आणि तो फुटून त्यातून गुलिगा जन्माला आला… शिवाय, भगवान विष्णुच्या रक्षणासाठी म्हणजेच पंजुर्लीच्या रक्षणासाठी गुलिगाला पाठवलं गेलं अशीही मान्यता दक्षिणेत आहे. (Kannada movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi