
Dhurandhar 2 ने अखेर ‘पुष्पा २’ ला मागे टाकलंच; ७ दिवसांत ८५० कोटी पार
‘बाप तो बाप रहैगा’ ही आजच्या तरुणाईची स्लॅंग आदित्य धर याच्या Dhurandhar : The Revenge चित्रपटाने तंतोतंत खरी ठरवली आहे. १९ मार्च २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित झालेल्या Ranveer Singh याच्या स्पाय थ्रिलर चित्रपटाने बॉलिवूडसह साऊथ चित्रपटांचीही झोप उडवली आहे. अवघ्या ७ दिवसांत देशात 500 Cr आणि जगात 850 Cr पार करणारा हा पहिला बॉलिवूडचा चित्रपट ठरला असून यामुळे इतर कोणतेही मेकर्स मार्च किंवा एप्रिलमध्ये त्यांचा पिक्चर रिलीज करण्याची रिस्क घेत नाही आहेत. दरम्यान, Pushpa 2 आणि RRR चित्रपटांना धुळ चारणाऱ्या ‘धुरंधर २’ ने किती कमाई केली आहे जाणून घेऊयात…(Dhurandhar 2 surpass Pushpa 2 on box office)
आदित्य धरच्या चित्रपटाने रिलीज होताच Opening Day लाच नवे रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून नाव कोरले आहे. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार 500 Cr चा टप्पा सर्वात वेगाने गाठणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. दर दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, पेड प्रीव्ह्यु 43 Cr, पहिल्या दिवशी 102.55 Cr, दुसऱ्या दिवशी 80.72 Cr, तिसऱ्या दिवशी 113 Cr, चौथ्या दिवशी 114.85 Cr, पाचव्या दिवशी 65 Cr, सहाव्या दिवशी 56.55 Cr, सातव्या दिवशी अद्याप 4.39 Cr कमवत आत्तापर्यंत भारतात या चित्रपटाने 580.06 Cr ची कमाई केली आहे.
Pushpa 2 चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर २३ दिवसांत या चित्रपटाने 1594 Cr वर्ल्डवाईड कलेक्शन केलं होतं. तर, भारतात 1128.85 Cr इतकी कमाई केली होती. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ६ दिवसांत १००० कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिला चित्रपट मानला जातो. त्यामुळे आता पुष्पा २ चित्रपटाचा देखील धुरंधर रेकॉर्ड मोडून आपलं नाव पुढे करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

तसेच, रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ आणि Allu Arjun अल्लू अर्जूनच्या‘पुष्पा २’ च्या बॉक्स ऑफिस कमाईती तुलना केली असता रिलीजच्या सहाव्या दिवशी ‘धुरंधर’ने भारतात 545.04 Cr नेट कलेक्शन केलं आहे, तर पुष्पा २ ने 368.10 Cr चं नेट कलेक्शन केलं होतं. तसेच, वर्ल्डवाईड कमाई पाहायची झाली तर ‘धुरंधर २’ ने ७ दिवसांत 937.49 Cr इतकी कमाई केली आहे. आणि लवकरच आता हा चित्रपट दुसऱ्या आठवड्यापूर्वीच 1000 Cr चा टप्पा गाठेल यात तिळमात्र शंका नाही.
================================
हे देखील वाचा : Dhurandhar 2 : “आदित्य धर म्हणजे बॉक्स ऑफिसचा बाप”; रजनीकांत यांची पोस्ट व्हायरल
================================
इतकंच नाही तर बॉलिवूडच्या किंग खानला देखील रणवीर सिंगने मागे टाकलं आहे. शाहरुख खानच्या Pathaan चित्रपटाच्या पहिल्या पाच दिवसांच्या कमाईला ‘धुरंधर’ने चक्का चूर केलं आहे. तसेच, या चित्रपटाने रिलीजनंतर केवळ पाच दिवसांतच परदेशात सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत तिसरे स्थान मिळवलं आहे. ‘पुष्पा 2’ (2024) ने परदेशात 271 Cr ची कमाई केली होती, भारतात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट असलेल्या ‘RRR’ ने परदेशात 314 Cr कमावले होते; तर ‘KGF 2’ ने 214 Cr आणि ‘Kalki 2898 AD’ ने 275 Cr ची कमाई केली होती. आता लवकरच आमिर खान याच्या Dangal चित्रपटाच्या 2000 कोटींना देखील Dhurandhar 2 लवकरच पार करेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
‘धुरंधर २’ ची कामगिरी इथवरच संपत नाही. तर, आमिर खान याच्या Dangal (2016) चित्रपटाने 387 Net Collection केलं होतं ते देखील सरपास केलं आहे. तसेच, Salman Khan च्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाचं लाईफटाईम कलेक्शन 320.34 Cr (Net Collection) आणि 444.92 Cr (Gross Collection) होतं ते देखील रणवीरने पार केलं आहे. (Dhurandhar 2 vs Dangal)

दरम्यान, ‘धुरंधर २’ मध्ये रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत असून अर्जून रामपाल, आर माधवन, संजय दत्त, Rakesh Bedi, सारा अर्जून यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. इतकंच नाही तर या चित्रपटात प्रेक्षकांसाी बरेच सरप्राईजेस देखील आहेत. त्यामुळे आता २०२५ प्रमाणेच २०२६ हे वर्ष देखील Ranveer Singh याचंचं असणार यात आता प्रेक्षकांना तिळमात्र शंका उरली नाही. (Ranveer Singh Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi