
Dhurandhar 2 : “आदित्य धर म्हणजे बॉक्स ऑफिसचा बाप”; रजनीकांत यांची पोस्ट व्हायरल
फोन हातात घेतला किंवा कुठलंही सोशल मिडिया चॅनल उघडलं की एकाच चित्रपटाची चर्चा सगळीकडे दिसून येत आहे तो म्हणजे आदित्य धर दिग्दर्शित Dhurandhar : The Revenge. आपल्या फाडू अभिनयाने Ranveer Singh याने भल्या भल्या अभिनेत्यांना मागे टाकलं आहे. आजवर बॉलिवूडमध्ये ज्यांनी राज्य केलं त्या सलमान, शाहरुख, आमिर यांनाही रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाने धुळ चारली आहे. जगभरातून या चित्रपटाचं कौतुक होत असताना आता सुपस्टार थलायवा रजनीकांत यांनीही चित्रपटाचं, रणवीरचं आणि संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे. काय म्हणाले आहेत Rajinikanth जाणून घेऊयात… (Dhurandhar 2 movie updates)
सोशल मिडियावर रजनीकांत यांनी Aaditya Dhar याच्या ‘धुरंधर २’ चित्रपटासाठी खास पोस्ट शेअर केली आहे, त्यांनी लिहिलं आहे की, ‘धुरंधर 2.. काय चित्रपट आहे! आदित्य धर.. बॉक्स ऑफिसचा बाप. रणवीर आणि संपूर्ण कास्ट, क्रू मेंबर्सचं अभिनंदन. प्रत्येक भारतीयाने पहावा असा हा चित्रपट आहे. जय हिंद’, अशा शब्दांत रजनीकांत यांनी कौतुक केलं आहे. आता स्वत: रजनीकांत आपल्या कामाचं कौतुक करत असतील तर ती गोष्ट प्रत्येक कलाकार, मेकर्ससाठी एखाद्या पुरस्कारापेक्षा नक्कीच कमी नाही आहे.(Rajinikanth post for dhurandhar)

रजनीकांत यांच्या या पोस्टवर आदित्य धर याने कमेंट करत त्यांचे आभार मानले आहेत. त्याने लिहिलं आहे की, “आम्ही सर्वजण मनोरंजन हे फक्त एकाच मापदंडाने मोजत मोठे झालो आहोत आणि तो मापदंड म्हणजे तुम्ही आहात. अनेक दशकांपासून आम्हाला हसायला, रडायला, आनंदात शिट्टी वाजवायला भाग पाडून, आमच्यात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करून आजही त्यात दिमाखात आणि सहजतेने हे सर्व करणं म्हणजे ही निव्वळ जादू आहे. त्यामुळे तुम्ही ‘धुरंधर 2’ला ‘मस्च वॉच’ म्हणणं हा माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा सुपरस्टार क्षण आहे. ज्या व्यक्तीने आम्हा सर्वांना मोठी स्वप्नं पाहण्याचं शिकवलं, त्याच व्यक्तीकडून आशीर्वाद मिळाल्यासारखं आहे. हे थेट माझ्या मनाला भिडलं आहे”… (Aaditya Dhar Post)
दरम्यान, आदित्य धर याच्या धुरंधरने बॉलिवूडचं नाही तर साऊथच्याही बऱ्याच चित्रपटांचे रेकॉर्ड्स मोडले आहेत. पाच दिवसांत ५०० कोटींचा टप्पा पार करत चित्रपटाने बजेटही रिकव्हर केलं आहे. तसेच, जागतिक पातळीवर १००० कोटींचा टप्पा अवघ्या काहीच दिवसांत पार करण्याचा नवा विक्रमही या बॉलिवूड चित्रपटाने आपल्या नावे केला हे विशेष. (Dhurandhar box office collection)

बरं असं नाही की आदित्य धर गेले अनेक वर्ष दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्रीत काम करतोय. पहिलाच चित्रपट जो त्याने २०१९ मध्ये डिरेक्ट केला त्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. Vicky Kaushal याची प्रमुख भूमिका असणाऱ्या URI : The Surgical Strike हा त्याचा दिग्दर्शक म्हणून पहिला बॉलिवूड चित्रपट. आणि त्यानंतर लगेचच धुरंधर हा चित्रपट तो घेऊन आला आणि या चित्रपटाने तर सुवर्णाक्षरांनी इतिहासच रचला.
================================
हे देखील वाचा : ट्रकच्या मागे लिहिलेल्या ओळीतून तयार झालेलं Salman Khan याचं रोमॅंटिक गाणं!
================================
दिग्दर्शक व्हायचं स्वप्न पाहूनच बॉलिवूडमध्ये आदित्य एन्ट्री केली होती. परंतु, ते स्वप्न पूर्ण करण्याआधी त्याने Kabir Khan यांच्या ‘काबूल एक्सप्रेस’ चित्रपटासाठी गाणं लिहिलं होतं. तसेच, दिग्दर्शक Priyadarshan यांना त्याने असिस्ट देखील केलं होतं. सहाय्यक दिग्दर्शन करत २०१९ मध्ये त्याने पहिला चित्रपट आणला आणि आपलं स्थान निर्माण केलं. आता येत्या काळात सलग २ चित्रपट हिट देणारा हा डिरेक्टर आणखी नवा कोणता ब्लॉकबस्टर चित्रपट आपल्यासाठी घेऊन येणार हे पाहण्यासाठी लोकं फारच उस्तुक आहेत.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi