
Dhurandhar 2 पाहून विराट कोहलीची उडाली विकेट!
परीक्षा संपल्या आहेत आणि पोरांना सुट्ट्या लागल्या आहेत… एकीकडे आयपील सुरु आहे आणि त्याचा आनंद लोकं घेताना दिसत आहेत, तर दुसरीकडे Dhurandhar : The Revenge चित्रपट बॉक्स ऑफिसवक चौकार, षटकार मारताना दिसत आहे… जगभरातून या चित्रपटाचं कौतुक होत असताना आता क्रिकेटच्या किंगने देखील ‘धुरंधर २’ पाहून आपली रिअॅक्शन दिली आहे. दिग्दर्शक आदित्य धर याचं तर त्यांने कौतुक केलं आहेच पण Ranveer Singh याच्या अभिनयाचा तो फॅन झाला आहे. काय म्हणाला आहे Virat Kohli जाणून घेऊयात… (Virat Kohli reaction after watching dhurandhar 2)
विराट कोहली याने सोशल मिडियावर पोस्ट करत Dhurandhar 2 चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे. पत्नी Anushka Sharma सोबत विराटने धुरंधर पाहिला असून पोस्ट करत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विराट म्हणतो, “Dhurandhar 2 चित्रपट पाहिला. भारतीय चित्रपटसृष्टीत अशा प्रकारचा सिनेमॅटिक अनुभव मी यापूर्वी कधीच घेतला नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून फार महत्वाच्या विषयाला आणि Emotions ला हात घालण्यात आला आहे. चार तासात मी एकदाही पापणी झाकली नाही”. (Dhurandhar 2 movie news)

पुढे विराटने दिग्दर्शक Aditya Dhar आणि रणवीर सिंग याचं कौतुक करताना लिहिलं आहे की, “अदित्य धर तू फार टॅलेंटेड आहेस. तुझ्याकडे असलेल्या Directors Vision मधून तू जे काही बनवलं आहेस ते अलौकिक आहे.. खरोखरच तुझं कौतुक केलं पाहिजे. तू फार हुशार आहेस. आणि यातील सगळ्याच कलाकारांनी उत्तम काम केलं आहे, पण रणवीर सिंग तू या चित्रपटानंतर एक नवा स्तर गाठला आहेस. उत्तमपेक्षाही उत्तम म्हणता येईल असा अभिनय तू या चित्रपटात केला आहेस. एकदमच वॉव चित्रपट आहे हा,” अशा शब्दांत त्याने Dhurandhar 2 चित्रपटाचं कौतुक आणि अभिनंदन केलं आहे…

दरम्यान, रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत ८५० कोटींचा टप्पा पार करत नवा इतिहास रचला आहे… sacnilk च्या रिपोर्टनुसार या चित्रपटाने भारतात 1233.41 Cr Gross Collection आणि 1030.29 Cr Net Collection केलं आहे. तसेच, पहिल्या आठवड्याच्या शेवटी 674.17 Cr, दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी 263.65 Cr कमवत आत्तापर्यंत एकूण 1030.29 Cr इतकी कमाई केली आहे… आणि वर्ल्डवाईड ही कमाई 1625.72 Cr इतकी आहे… येत्या काळात रणवीर सिंगचा चित्रपट Dangal चित्रपटाचा 2000 Cr चा रेकॉर्ड मोडणार अशी चिन्ह दिसत आहेत… (Dhurandhar 2 box office collection)
================================
हे देखील वाचा : Dhurandhar 2 : दोन्ही पार्ट्समधून 1000 कोटींची कमाई करणारा पहिलाच चित्रपट!
================================
Ranveer Singh बॉलिवूडमधला असा एक Under Rated अभिनेता होता ज्याने आपल्या कामाने खरंच लोकांना, मेकर्सना त्याची दखल घेण्यास भाग पाडलं आहे. ‘धुरंधर’ चित्रपटाबद्दल आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही पार्ट्समधून 1000 कोटींची कमाई करणारा हा इतिहासातील पहिलाच चित्रपट ठरला आहे. तसेच, केवळ हिंदी भाषेत Dhurandhar 2 ने 900 Cr चा टप्पा पार केला असून 1000 Cr कमावणारा बॉलिवूडमधलाच नाही तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीतील हा पहिला चित्रपट ठरणार आहे…(First Indian Film earned 1000 Cr)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi