Skip to content Skip to sidebar Skip to footer

रितेशच्या Raja Shivaji या मराठी चित्रपटात बॉलिवूड कलाकारांचा डेब्यु!

छत्रपती शिवाजी महाराज ही जय! हे ऐकलं तरी कसं प्रसन्न वाटतं… रयतेला स्वराज्य मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या आपल्या शिवरायांचा इतिहास कायमच प्रेरणा देणारा आहे. आणि आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर त्यांची कामगिरी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. मराठीतील पहिल्या १०० कोटींचं बजेट असणाऱ्या Raja Shivaji चित्रपटातून छत्रपती शिवरायांचा इतिहास मोठ्या पडद्यावर येणार असून यात बॉलिवूडचे दिग्गज कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत डेब्यु करणार आहेत. चला तर जाणून घेऊयात… (Bollywood Celebs Marathi Debut)

रितेश देशमुख लिखित, दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात तो स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. त्याच्यासोबत चित्रटपटात बॉलिवूडचे KNOWN कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. त्यापैकी पहिला अभिनेता आहे Abhishek Amitabh Bachchan ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिषेक मराठीत पदार्पण करणार असून यात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी पण तुलनेने कमी चर्चेत राहिलेले ज्येष्ठ बंधू संभाजी शहाजी राजे भोसले यांची भूमिका साकारली आहे. टीझरमधली त्याची झलक अंगावर काटा आणणारी आहे. योद्ध्याचा साद, डोळ्यांत तेज, युद्धभूमीवरची दमदार हजेरी आणि आपल्या बंधु व वडिलांप्रती चेहऱ्यावरुन दिसणार प्रेम याचा उत्तम मेळ अभिषेकच्या अभिनयातून दिसत आहे. (Historical movie Raja Shivaji)

अभिषेकने ‘राजा शिवाजी’ चित्रपट आणि रितेशबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं की, “हा माझा पहिलाच मराठी चित्रपट आहे आणि याचा भाग होणे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. रितेश विलासराव देशमुखचे छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवण्याचे स्वप्न अनेक वर्षांपासून आहे. मी Riteish Deshmukh याला जवळपास 25 वर्षांपासून ओळखतो. लातूरमध्ये माझ्या ‘जमीन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमची पहिली भेट झाली. त्यावेळी मी अजय देवगणसोबत शूटिंग करत होतो आणि रितेश आम्हाला भेटायला आला होता. तिथूनच आमच्या मैत्रीची सुरुवात झाली आणि पुढे आम्ही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.” (Abhishek Bachchan & Riteish Deshmukh Friendship)

‘राजा शिवाजी’ चित्रपटाबद्दल बोलताना अभिषेक असं म्हणाला की, “एकदा रितेश विलासराव देशमुखच्या घरी भेट दिली असता त्याने अभिनयाच्या पलीकडे जाऊन दिग्दर्शन करण्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट साकारण्याचे आपले स्वप्न समोर मांडले होते. “हे असे स्वप्न आहे जे त्याने अनेक वर्षे जपले आणि त्यासाठी सातत्याने मेहनत घेतली. आणि महत्वाचं म्हणजे हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण ठरेल”, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. याशिवाय, Fardeen Khan, Sanjay Dutt यांचाही हा पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे. (Entertainment News)

================================

हे देखील वाचा : 100 कोटींच्या Raja Shivaji चित्रपटातील Characters झाले रिव्हील!

================================

तर, चित्रपटातील इतर कलाकार म्हणजे Salman Khan याने आधी ‘वेड’ मध्ये कॅमिओ केला होता, Boman Irani ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटात दिसले होते. Vidya Balan हिने मंगेश देसाई यांच्यासोबत ‘एक अलबेला’ चित्रपट केला होता. Genelia Deshmukh ‘लय भारी’, ‘वेड’ या चित्रपटात झळकली होती. तर, Bhagyashree ‘झक मारली बायको केली’, ‘वात्सल्य’ या चित्रपटांमध्ये दिसली आहे. त्यामुळे आता इतर कलाकारांचा मराठी डेब्यु Raja Shivaji चित्रपटामुळे सुरहिट ठरणार यात तर शंका नाहीच. (Raja Shivaji Movie cast)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!