
Big Boss Marathi 6 : सागरने बायको आणि मुलीला पाहिलं की भूताला?
Marathi Big Boss season 6 : मराठी बिग बॉसचं सहावं पर्व आता हळूहळू अंतिम टप्प्यात येत आहे. ग्रॅण्ड फिनालेसाठी अवघा १ महिना रहिला असून घरातील प्रत्येक स्पर्धक आता आपला गेम अप करण्यासाठी अधिक प्रयत्न करत आहेत. अशातच दोन-अडीच महिने घरापासून लांब राहिलेल्या सदस्यांना भेटण्यासाठी त्यांचे कुटुंबिय नुकतेच बिग बॉसच्या घरात आले होते. आई, वडिल, बहिण यांना पाहून प्रत्येकांच्या अश्रुंचा बांध फुटला होता. Sagar Karande याचीही बायको आणि मुलगी घरात त्याला भेटायला गेल्या होत्या, मात्र त्यांना पाहून ज्या प्रकारे सागर रिअॅक्ट झाला ते नेटकऱ्यांनी हेरलं आहे. (Big Boss Marathi)
नुकताच घरामध्ये फॅमेली गेट टू गेदर झालं. बिग बॉस घरातील प्रत्येक सदस्ला फ्रीज करत होते आणि एक एक करुन घरातील मंडळी त्यांना भेटायला येत होते. प्रत्येकाच्या घरचे मुख्य दारातून आत येत होते. परंतु, (Sagar Karande Family) सागरला त्याचा माईक नीट चालत नसल्याचं सांगून स्टोररुममध्ये पाठवत त्याला तिथे त्याची बायको आणि मुलगी भेटायला आल्याचं मोठं सरप्राईज मिळालं. त्यांना पाहून सागर फार जोरात ओरडला आणि त्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांना जर खटकली आणि त्यामुळे तो सोशल मिडियावर ट्रोल झाला. (Entertainment)

सोशल मिडियावर शेअर केलेल्या या प्रोमोवर लोकांनी कमेंट्स करत सागरच्या प्रतिक्रियेवर आपली मतं व्यक्त केली आहेत. घरात आपल्याला भेटायला बायको आणि मुलगी येणार याची कल्पना नक्कीच सागरला होती, त्यामुळे इतकं ओव्हर रिअॅक्ट होण्याची गरजच नव्हती असं काही लोकांनी म्हटलं आहे. तर, काही जणांनी थेट घरात भूत पाहिल्यासारखं सागर ओरडला असं देखील म्हटलं आहे. काहींनी तर लिहिलं आहे की, ‘वाहिनी सागर भाऊला घरी घेऊन जा आता’, ‘सागरने भूत पाहिलं की काय?’, ‘एवढं नाटक करायची काय गरज आहे?’, ‘हा असाच आहे का ओव्हर अॅक्टिंग करतो’, ‘भूत बघितल्या सारखं का ओरडला पण सागर?’, ‘सागरला बाहेर काढा’,‘एकतर आरडा ओरडा नाही तर मग रडारड बस इतकंच येतंय!’ अशा खरमरतीत कमेंट्स करत सागरला ट्रोल केलं गेलं आहे. (Sagar Karande Trolling)

बरं, बिग बॉसच्या घरात गेल्यापासून पहिल्यांदाच सागर ट्रोल झाला आहे किंवा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे असं नाही. बिग बॉसच्या घरात त्याचा फारसा गेम नाहीये असं लोकांनी सोशल मिडियावर याआधी देखील म्हटलं होतं. शिवाय, सागरला स्वत:ची मतं नाहीत, मुद्दे मांडता येत नाहीत, भांडता येत नाही असं देखील म्हटलं गेलं होतं. त्यामुळे आता बायको आणि मुलीने दिलेल्या सल्ल्याचा सागर विचार करुन आपली पुढची गेमची स्ट्रेटजी आखणार का? हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे.
================================
हे देखील वाचा : Boman Irani यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दादरला का बोलावलं?
================================
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचा (Big Boss Marathi Season 6) अकरावा आठवडा आता सुरु झाला असून घरात सध्या टॉप १० स्पर्धक उरले आहेत. Rakesh Bapat, तन्वी कोलते, प्रभू शेळके, दिपाली सय्यद, रेवा कौरासे, संकेत पाठक, अनुश्री माने, विशाल कोटियन, Rakhi Sawant आणि सागर कारंडे. आता यांच्यापैकी पुढच्या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि प्रेक्षकांच्या मते सध्यातरी टॉप २ स्पर्धक Vishal Kotian आणि Tanvi Kolte हे आहेत. आता खरंच घरातील हे दुश्मन सदस्य तो पल्ला गाठणार का हे पाहणंही औत्सुक्याचं असणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi