'पिक्चरचं जग' म्हणजे अनेकदा तरी ऐकावं ते नवलच आणि अविश्वसनीय! आजच्या डिजिटल युगात, मल्टीप्लेक्स स्क्रीनवर सुपरडुपर हिट चित्रपट जास्तीत जास्त आठ ते दहा आठवड्याचा मुक्काम केला तरी ती फार भारी गोष्ट. याचं कारण आज एकाच शुक्रवारी देश विदेशातील अधिकाधिक मल्टीप्लेक्स स्क्रीनवर आणि अनेक शोने नवीन चित्रपट प्रदर्शित होतो, याचाच अर्थ नवीन चित्रपटाचे प्रदर्शन आता वाढलंय…