Skip to content Skip to sidebar Skip to footer

खरंच Ameena चित्रपटाने शंभर आठवडे मुक्काम केला

‘पिक्चरचं जग’ म्हणजे अनेकदा तरी ऐकावं ते नवलच आणि अविश्वसनीय! आजच्या डिजिटल युगात, मल्टीप्लेक्स स्क्रीनवर सुपरडुपर हिट‌ चित्रपट जास्तीत जास्त आठ ते दहा आठवड्याचा मुक्काम केला तरी ती फार भारी गोष्ट. याचं कारण आज एकाच शुक्रवारी देश विदेशातील अधिकाधिक मल्टीप्लेक्स स्क्रीनवर आणि अनेक शोने नवीन चित्रपट प्रदर्शित होतो, याचाच अर्थ नवीन चित्रपटाचे प्रदर्शन आता वाढलंय आणि त्यात एकाच वेळी अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत तो पोहचत असल्याने चित्रपटाने चित्रपटगृहात अधिक काळ मुक्काम करणं कालबाह्य होत गेले.

अनेक गोष्टी बदलल्या तशीच ही गोष्टही बदलली आणि त्यात लोकप्रिय चित्रपटाचा पंचवीसावा रौप्य महोत्सवी आठवडा अथवा पन्नासावा सुवर्ण महोत्सवी आठवडा अशा गोष्टी फ्लॅशबॅकमध्ये जमा झाल्या. आठवणीचा भाग झाल्या. अशा वेळी एखाद्या चित्रपटाने २०२६ साली मल्टीप्लेक्स स्क्रीनवर चक्क शंभर आठवड्याच्या मुक्काम करावा? हा चमत्कार नव्हे तर ही वस्तुस्थिती आहे.कुमार राज दिग्दर्शित ‘अमीना’ (Ameena) या चित्रपटाने मुंबईतील पश्चिम एक्सप्रेस हायवेवरील मुव्ही टाईम या मल्टीप्लेक्समध्ये चक्क शंभर आठवड्याच्या मुक्काम केला आहे आणि तसे लक्षवेधक पोस्टर डिझाइन या मल्टीप्लेक्सवर लावले आहे.

२०२४ च्या मार्च महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी हा चित्रपट मुंबईसह देशभरात प्रदर्शित झाला. एक दोन आठवड्यात तो अनेक ठिकाणांहून गेलादेखिल. पण मुव्ही टाईममध्ये तो कायम राहिला. प्रत्येक खेळाला आठ दहा प्रेक्षक असतील. पण एक नवीन विक्रम केला हे महत्वाचे. आफताब हसेन आणि कृष्ण पवार यांची पटकथा असलेल्या या चित्रपटात अनंत महादेवन आणि रेखा राणा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

================================

हे देखील वाचा : Grahan नावाच्या चित्रपटात नूतनचे नायक सुभाष घई

================================

चित्रपटगृहात सर्वाधिक काळ मुक्काम केलेला चित्रपट अर्थातच आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ (१९९५). तो मुंबईत २० ऑक्टोबर १९९५ रोजी प्रदर्शित झाला. दक्षिण मुंबईतील न्यू एक्सलसियर चित्रपटगृहात त्याचा यशस्वी पन्नास आठवड्याचा मुक्काम केल्यावर तो मराठा मंदिर चित्रपटगृहात मॅटीनी शोला शिफ्ट करण्यात आला आणि आजही, होय आजही म्हणजेच तब्बल तीस वर्षे पूर्ण होवूनही तो तेथेच आहे. काही हिंदी आणि इंग्रजी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी दरवर्षी २० ऑक्टोबर रोजी मराठा मंदिर चित्रपटगृहाला भेट देताना मला भेटतात. कारण मीदेखील या दिवशी जात असतो. चित्रपटविषयक इतिहासाचे आपण साक्षीदार असावे असे मनोमन वाटते.

जी. पी. सिप्पी निर्मित आणि रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (१९७५) चा विक्रम असाच भारी. १५ ऑगस्ट १९७५ ते ३१ ऑगस्ट १९७८ असा या चित्रपटाने मिनर्व्हा चित्रपटगृहात दिवसा तीन खेळ याप्रमाणे हाऊसफुल्ल गर्दीत तीन वर्षे मुक्काम केल्यावर तो तेथेच मॅटीनी शोला शिफ्ट करण्यात आला आणि त्याने आणखी दोन वर्षे असा मिळून पाच वर्षे मुक्काम केला. त्या काळात चित्रपट पाह्यचा तर एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये जावे लागत होते.  आज आपल्या हातातील मोबाईल स्क्रीनवरही चित्रपट पाहता येतोय. शोले म्हणजे यश हे समीकरण घट्ट आहे. शोले न संपणारी यशोगाथा.

================================

हे देखील वाचा : Indian Cinema : तेव्हा रंगलेले चित्रपट आता नक्कीच अळणी वाटतात…

================================

शंभर आठवड्याचा मुक्काम करण्यात मराठी चित्रपटही यशस्वी ठरला आहे. निर्माता आणि दिग्दर्शक अनंत माने यांच्या ‘सांगत्ये ऐका’ ( १९५९) या चित्रपटाने पुणे शहरातील विजयानंद चित्रपटगृहात १३१ आठवड्याचा मुक्काम केला. विजय कोंडके निर्मित आणि दिग्दर्शित ‘माहेरची साडी’ (१९९१) या चित्रपटाने मुंबईतील चित्रा चित्रपटगृहात १२५ आठवड्याचा मुक्काम केला. आजही अलका आठल्येला या चित्रपटाच्या यशावर आजच्या जेन झी पिढीचे पत्रकार प्रश्न करतात. चित्रपटाच्या खणखणीत यशाचे हे भारी विक्रम आहेत. आणि त्याच्या आठवणी कायमस्वरुपी आहेत हे विशेषच. चित्रपटाच्या जगात यशासारखे वजनदार काहीही नाही. त्याचा कायमच गवगवा होतो. ‘ अमीना ‘ या चित्रपटाच्या यशाचेही कौतुक आहे….

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!