Skip to content Skip to sidebar Skip to footer

Big Boss Marathi 6 : “वाईल्ड कार्ड नाही हे चाइल्ड कार्ड…”, रितेश देशमुखने घेतली रेवा-संस्कृतीची शाळा

बिग बॉस मराठीचा सहावा सीझन आता आठव्या आठवड्यात येऊन पोहोचला आहे. आठवड्याची दमदार सुरुवात होण्याआधी घरात एक नाही तर ३ सदस्यांनी वाईल्ड कार्ड एन्ट्री केली होती. संकेत पाठक, संस्कृती साळुंखे आणि रेवा कौरासे यांनी घरात येण्याआधी भाऊच्या धक्क्यावर विचारांची clarity दाखवत रितेशला आणि प्रेक्षकांना इम्प्रेस केलं होतं. पण जसे ते घरात गेले अगदी त्याचक्षणी संस्कृतीने तिला मिळालेली पॉवर की गमावली. त्यानंतर रेवाने देखील हलगर्जीपणा करत चावी गमावली. आता यामुळेच भाऊच्या धक्क्यावर रितेशने दोघींना चांगलं सुनावलं आहे. (Big Boss Marathi 6)

नुकताच सोशल मीडियावर या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्याचा प्रोमो रिलीज झाला. यात रितेश रेवा आणि संस्कृतीची शाळा घेताना दिसला. सर्वात आधी विशालने संस्कृतीची पावर की गायब केली. यामुळे संस्कुतीला तिची इम्युनिटी तिला गमवावी लागली. त्यानंतर प्राजक्ता शुक्रेनेही रेवाला बोलण्या-बोलण्यात तिची पॉवर की पळवली. आयती मिळालेली पॉवर की आपल्या हलगर्जीपणाने गमावल्यामुळे रितेश चांगलाच संतापला होता. (Riteish Deshmukh)

रितेश रेवा आणि संस्कृतीला ओरडताना म्हणाला की, ” संस्कृती आणि रेवा तुम्ही पावर की घालवली. तुम्ही आठवड्याभरात जे काही करत होता तो बालिशपणा होता, निष्काळजीपणा, बेपर्वाही, बेजबाबदारी होती… त्यावरून असं वाटतं की बिग बॉसने घरात वर्ल्ड कार्ड नाही तर चाइल्ड कार्ड पाठवले आहे”. (Reva Kaurase & Sanskruti Salunkhe)

================================

हे देखील वाचा : सचिन तेंडूलकरची सून Saaniya Chandhok आहे Business Women!

================================

आता रितेशच्या ओरड्यामुळे रेवा आणि संस्कृती पुढच्या आठवड्यात आपला गेम चेंज करणार की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तसेच, या आठवड्यात संस्कृती नॉमिनेट झाली असून तिचा या घरातला प्रवास पहिल्याच आठवड्यात संपणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे. त्यामुळे या आठवड्यात घराबाहेर कोणता सदस्य जाणार याकडे सगळेच नजर लावून आहेत. (Big Boss Marathi season 6)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!