Skip to content Skip to sidebar Skip to footer

अनुश्रीच्या परवानगीशिवाय तिच्या अंगाला हात लावला; रुचिकाने केला Raquesh Bapatवर गंभीर आरोप

मराठी ‘बिग बॉस सीझन ६’ (Big Boss Marathi Season 6) च्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात कडाक्याच्या भांडणाने झाली. १९ जानेवारीच्या एपिसोडमध्ये राकेश बापट याच्यावर रुचिका जामदार आणि अनुश्री माने या दोघींनी फार गंभीर आरोप केले आहेत. कलर्समराठीवर या एपिसोडचा प्रोमो शेअर करण्यात आला असून यात राकेश त्याच्यावर झालेल्या आरोपांमुळे संतापलेला दिसत असून बिग बॉसकडे त्याने घराबाहेर जाण्याची मागणी केली आणि मुख्य प्रवेशद्वार उघडलं असं दाखवण्यात आलं आहे. नेमकी काय झालं जाणून घेऊयात.

तर, झालं असं की, अनुश्री ज्या बेडवर झोपली होती त्यामुळे घरातील इतर सदस्यांना गैरसोय होत होती. त्यामुळे प्राजक्ता, तन्वी, राधा आणि राकेश बापट अनुश्रीला समजवायला गेले. तिने फक्त त्या बेडवरुन उठून दुसरीकडे झोपावं यासाठी सगळेच तिला समजावत होते. परंतु, तिने त्यांच्यावर उलटा आरडाओरडा करुन मला झोपेतून उठवू नका, मी एडजस्ट करणार नाही असं म्हटलं. त्यावेळी सगळेच तिथे उपस्थित असताना राकेशने तिचा हात धरुन फक्त तिला उठ अनश्री दुसरीकडे झोप असं म्हटलं. यावरुनही तेहा तिने तु मला असं झोपेतून उठवू नको असं म्हटलं. शेवटी सदस्यांनी या अडचणीवर तोडगा काढला आणि ते प्रकरण तिथेच मिटलं. (Raquesh Bapat & Anushree Mane)

परंतु, दुसऱ्यादिवशी रुतिका आणि अनुश्री बसले असता अनुश्रीने राकेशने तिला असं हात धरुन उठवल्याचं तिला आवडलं नसल्याचं शेअर केलं. पण त्यानंतर उलटा-पुलटा टास्कदम्यान रुचिकाने राकेश-अनुश्रीचा तो मुद्दा उपस्थित करत वाद सुरु केला. कोणत्याही मुलीला तिच्या परवानगीशिवाय टच करु नये इतकं समजत नाही असा आरोप तिने राकेशवर केला. यावरुन घरातील सगळ्यांनाच तिचं हे विधान फार वेगळ्या पद्धतीने बाहेर जातंय असं वाटलं आणि त्यावरुन मोठा वाद सुरु झाला. (Ruchika Jamdar)

अनुश्री माने राकेशला या वादात म्हणाली की, “मला कोणीही माझ्या बेडवरून हलवू शकत नाही. जिथे तू हात धरून मला उठवलंस ना, तिथेच माझ्या डोक्यात गेलास तू”. अनुश्रीचं हे बोलणं ऐकून राकेशचा पारा चढला. तो संतापून म्हणाला, “हे बोलणं चुकीचं आहे. हे पुन्हा बोलण्याची हिंमत करू नकोस. आयुष्यात मी २५ वर्ष एवढं काम केलं आहे, कोणाची हिंमत आहे की मला असं कोणी बोलेल?” त्यानंतर राकेश संतापला आणि त्याने घरातून बाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली. “मला या घरात आता थांबायचं नाहीये”, असं म्हणत राकेश तिथून निघून गेल्याचं व्हिडीओत दिसत आहे. (Raquesh Bapat News)

================================

हे देखील वाचा : Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात येणार मोठा ट्विस्ट; दार उघडणार आणि नशिब उल्टा-पुल्टा होणार ! 

================================

पुढे ‘बिग बॉस’नेही घराचं दार उघडल्याचं प्रोमोमध्ये दिसतं. आता हा वाद मिटणार की राकेश खरोखर घर सोडणार? हे पाहावं लागेल. शिवाय, या आठवड्याच्या शनिवारी रितेश देशमुख (Riteish Deshmukh) या वादाबद्दल काय बोलणार? नेमकी कुणाला धारेवर धरणार हे पाहण्यासाठी आता प्रेक्षक फारचं उस्तुक आहेत. तोवर तुम्हाला या भांडणात राकेशची चुक वाटते की अनश्री आणि रुचिकाची हे आम्हाला नक्की कळवा. तसेच, पहिल्या आठवड्यात कुणीही घराबाहेर न गेल्यामुळे आता दुसऱ्या आठवड्यातही करण सोनावणे, अनुश्री माने, दिपाली सय्यद, दिव्या शिंदे, प्रभू शेळके, रोशन भजनकर, रुचिता जामदार, राधा पाटील आणि सागर कारंडे या सदस्यांवरही नॉमिनेशनची टांगती तलवार आहे. (Marathi Entertainment News)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!