Skip to content Skip to sidebar Skip to footer

Dhurandhar 2 The Revenge Trailer: रहमान डकैतच्या मृत्यूनंतर ल्यारीचा बादशाह कोण? Ranveer Singhचा खतरनाक अवतार पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला

गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक ज्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत होते त्या ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’ (Dhurandhar The Revenge Trailer) या सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच निर्मात्यांनी ट्रेलर रिलीज करून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. या ट्रेलरमध्ये रणवीर सिंग, संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांची प्रभावी झलक पाहायला मिळत असून, अॅक्शन आणि थराराने भरलेला हा सिनेमा प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल अशी चर्चा रंगली आहे.(Dhurandhar 2 The Revenge Trailer)

Dhurandhar 2 The Revenge Trailer
Dhurandhar 2 The Revenge Trailer

सुमारे 3 मिनिटे 25 सेकंदांचा हा ट्रेलर रणवीर सिंगच्या जबरदस्त अॅक्शनने सुरू होतो. या चित्रपटात तो ‘हमजा अली’ नावाच्या रॉ एजंटची भूमिका साकारत असून, पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्कचा नायनाट करण्यासाठी तो धोकादायक मिशनवर निघालेला दिसतो. ट्रेलरमध्ये रहमान डकैतच्या मृत्यूची बातमी समोर येते आणि त्यानंतर अंडरवर्ल्डमध्ये खळबळ उडते. त्यानंतर पुढचा बादशाह कोण होणार, याभोवती कथानक फिरताना दिसते. विशेष म्हणजे या भागात रणवीर सिंग दुहेरी भूमिकेत दिसणार असल्याचेही ट्रेलरमधून स्पष्ट होते.

Dhurandhar 2 The Revenge Trailer
Dhurandhar 2 The Revenge Trailer

या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची भक्कम स्टारकास्ट. अक्षय खन्नाच्या अभिनयाचे सोशल मीडियावर विशेष कौतुक होत आहे. तर संजय दत्त एका कडक पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. राकेश बेदी एका विनोदी राजकारण्याच्या भूमिकेत रंग भरताना दिसतात, तर आर. माधवनच्या गंभीर भूमिकेमुळे कथेला वेगळा आयाम मिळतो. दुसरीकडे अर्जुन रामपालने साकारलेला क्रूर खलनायक रणवीर सिंगच्या पात्राला जोरदार टक्कर देताना दिसतो. याशिवाय शाश्वत सचदेवच्या दमदार संगीतामुळे ट्रेलरला अधिक ऊर्जा मिळाल्याचे जाणवते. (Dhurandhar 2 The Revenge Trailer)

===============================

हे देखील वाचा: ‘देवबाभळी’नंतर Paresh Rawal  यांना केल आणखी एका मराठी नाटकाच कौतुक; अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ

===============================

दरम्यान, ‘धुरंधर 2’ 19 मार्च रोजी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. परदेशात या चित्रपटासाठी प्री-बुकिंगला सुरुवात झाली असली तरी भारतात अद्याप सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. अलीकडेच काही चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीचा आणि विलंबाचा सामना करावा लागला असल्याने या चित्रपटाला कोणते बदल करावे लागतात का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्या भागातील अॅक्शन आणि हिंसक दृश्यांमुळे मोठी चर्चा झाली होती, त्यामुळे सिक्वेलला सेन्सॉरकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!