मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळातील अभिनेता विवेक (जन्म २३ फेब्रुवारी १९१६) आज कुणाला आठवण्याची सुतराम शक्यता नाही . पण पन्नास आणि साठ च्या दशकात या देखण्या अभिनेत्याने चांगलीच लोकप्रियता हासील केली होती. त्यांच्या रूपेरी पडद्यावरील प्रवेशाचा किस्सा अगदी ऐकण्यासारखा आहे. खरं तर विवेकला सिनेमात यायचंच नव्हतं .त्याचं पहिलं प्रेम होतं क्रिकेट आणि दुसरं चित्रकला. घरची परिस्थिती बेतास…