मानवी नातेसंबधातील अनेक पदरांचा हळुवार वेध घेत ,सुमित्रा भावे यांच्या चित्रपटातील पात्रे प्रेक्षकांपुढे येत असायची. हि पात्रे सच्ची असायची. हाडामासाची असायची. त्यांच्या भूमिकांना प्रामाणिकतेचा ध्यास असायचा. त्या मुळे सुमित्रा भावे यांचा सिनेमा मनाला आतून भिडायचा. गमंत म्हणजे नव्वदच्या दशकात मराठी सिनेमा दर्जाच्या बाबत घसरणीच्या पातळीवर पोचला होता. अचकट विचकट विनोद करून त्याचा पार चोथा होत…