तुम्ही अमिताभ बच्चनचे जबरा फॅन असाल तर त्याचा ' सत्यम' नावाचा चित्रपट कधी बरं पडद्यावर आला होता ते सांगा? स्मरणशक्तीला थोडा ताण दिलात तरी प्रकाश मेहरा दिग्दर्शित 'जादुगर' (१९८९) नावाचा त्याचा चित्रपट आठवेल. अमिताभ बच्चनचा तो त्या काळातील सगळ्यात फ्लॉप चित्रपट होता. खरं तर प्रकाश मेहरा आणि अमिताभ बच्चन ही सुपर डुपर हिट जोडी. 'जंजी…