२०२५ हे वर्ष तसं मराठी इंडस्ट्रीसाठी फार खास राहिलं नाही. काही आयकॉनिक सिनेमे आले, जसे ‘आता थांबायचं नाय’, ‘दशावतार’, ‘साबर बोंडं’, ‘गोंधळ’, ‘उत्तर’ आणि बरेच… पण बाकीचे नेहमीप्रमाणे आपटले. २०२५ या वर्षात ११० मराठी चित्रपट प्रदर्शित झाले होते. पण या सर्व चित्रपटांची एकत्रित मिळून कमाई फक्त आणि फक्त ९९ कोटी ४६ लाख रुपये इतकीच झाली.…
२०२६ हे वर्ष जितकं इतर भाषिक फिल्म इंडस्ट्रीसाठी महत्वाचं आहे, तितकच मराठीसाठीही आहे… कारण याच वर्षात मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील दोन सर्वात जास्त बजेट असलेले चित्रपट येणार आहेत आणि दोघांचं पोटेन्शिअल असं आहे की हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला हमखास जमवू शकतात. ते दोन चित्रपट म्हणजे 'राजा शिवाजी' आणि 'खाशाबा'… 'राजा शिवाजी'चा दिग्दर्शक…