भारतीय चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील प्रत्येक संगीतकाराचे कर्तृत्व झळाळून निघत होते.यातील पहिल्या फळीतील संगीतकारांची बातच काही और होती पण त्याच वेळी दुसऱ्या आणि त्या पुढच्या फळीतील संगीतकार हे आजच्या कुठल्याही संगीताकारापेक्षा काकणभर सरसच होते हि बाब सूर्य प्रकाशाइतकी सत्य आहे.हाताशी मोठमोठी बॅनर नाहीत,चोटीचे दिग्दर्शक नाहीत आणि लोकप्रिय कलावंत चित्रपटात नसतानाही या संगीतकारांनी त्याचं संगीत लोकप्रिय केले.यातच…