या मालिकेत अरुण नलावडे आत्माराम जाधव उर्फ आबा ही भावनिक व्यक्तिरेखा साकारत आहेत.
माउलींचे समता, बंधुतेचे विचार आणि आचरण यांचे आदर्श उलगडून दाखवतानाच प्रेक्षकांना दिव्यत्वाचे दर्शनही अनुभवायास मिळणार आहे.
मराठी चित्रपटांमध्ये विविधांगी प्रयोग सातत्याने सुरु आहेत. शिवाय प्रेक्षकांना कोणत्याङी भाषेतील भयपट किंवा थरारपट पाहायला फार आवडतात आणि हिच प्रेक्षकांची आवड जपत ‘छबी’ (Chhabi) हा गुढ आणि रहस्यमय चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. कोकणात फोटोग्राफी करणाऱ्या फोटोग्राफरला आलेल्या गूढरम्य अनुभवाची थरारक गोष्ट ‘छबी’ या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटाचा रंजक टीझर लाँच करण्यात आला…
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचा विडा हाती घेऊन ‘शिवराज अष्टक’ ही संकल्पना दिग्दर्शक Digpal Lanjekar यांनी मराठी चित्रपटसृष्टीत रुजवली आणि त्यानुसार एकामागून एक ऐतिहासिक चित्रपट भेटीला आणले. आता त्यानंतर संत मुक्ताई यांचे जीवन मोठ्या पडद्यावर लवकरच लांजेकर घेऊन येणार आहेत. संत मुक्ताईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’…