पन्नास आणि साठच्या दशकामध्ये आपल्या नृत्य आणि अभिनयाने रसिकांवर अमिट छाप टाकणाऱ्या अभिनेत्री वैजयंतीमाला या अभिनेत्रीचा चित्रपटातील प्रवेश कसा झाला हा मोठा इंटरेस्टिंग किस्सा आहे. आज वैजयंतीमाला ९२ वर्षाच्या आहेत. चित्रपट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राज्यसभेवर त्या खासदार म्हणून कार्यरत होत्या. एक परिपूर्ण आयुष्य त्यांना जगत आहेत. १३ ऑगस्ट १९३३ रोजी जन्मलेल्या वैजयंतीमालाला…
पन्नासच्या दशकामध्ये राज कपूर यांनी आपल्या चित्रपटांनी देश आणि विदेशातील प्रेक्षकांना भारावून टाकले होते. राज कपूर (Raj kapoor) आणि नर्गिस हे त्या काळातील सर्वांचे लाडके आयकॉनिक रोमँटिक कपल होते.