Skip to content Skip to sidebar Skip to footer

Bigg Boss Marathi 6 : राकेश आणि अनुश्री यांच्यात पुन्हा वाद; कोणाची होणार बोलती बंद?

कलर्स मराठी (Colors Marathi) वरील रिअॅलिटी शो Bigg Boss Marathi 6 च्या घरात आता संघर्षाचे वातावरण अधिकच तापलेल पहायला मिळत आहे . रोज नवनवीन वाद, चर्चा आणि भावनांचा तुफान आपल्याला घरात पाहायला मिळत आहे. सदस्यांमधील साधे संवाद ही लवकरच वादात रूपांतरित होतात, आणि या मालिकेचा गेम आणखी तिखट होत चालला आहे. अलीकडेच कलर्स मराठीने सोशल मीडियावर एक नवीन प्रोमो शेअर केला आहे, ज्यात राकेश बापट ( Rakesh Bapat) आणि अनुश्री माने (Anushri Bapat) यांच्यात जोरदार तणाव दिसून येतो. हे दोघे आधीही आधीच्या भागात भांडण करताना पाहिले गेले होते, जिथे अनुश्रीने राकेशविषयी काही वक्तव्य केले होते. त्या वेळेस मराठी कलाकरांमध्ये राकेशला भरभरून समर्थन मिळाले होते.(Bigg Boss Marathi 6)

Bigg Boss Marathi 6 Update
Bigg Boss Marathi 6 Fight

या नवीन प्रोमोमध्ये राकेश पुन्हा एकदा संतापलेला आणि आक्रमक अवस्थेत दिसतो. घरकामाच्या मुद्द्यावरून तो अनुश्रीला निशाणा बनवतो आणि ती “घरात काम करत नाही” असा आरोप उपस्थित करतो. राकेश म्हणतो, “घरात एकही काम न करणाऱ्या मुलीचे आपण का ऐकून घ्यायचे?” हा वाक्य ऐकून इतर सदस्यही थक्क झाल्याचे चित्र प्रोमोमध्ये दिसते.

Bigg Boss Marathi 6 Update
Bigg Boss Marathi 6 Fight

दुसरीकडे, अनुश्रीनेही तग धरून प्रत्युत्तर दिले आहे. दोघांमध्ये शब्दयुद्ध इतके वाढले झाले की आता या दोघांमध्ये “कोण जास्त ओरडेल?” अशी स्पर्धा सुरू झाली आहे. राकेश वारंवार अनुश्रीला शांत राहण्याचा सल्ला देत असताना, अनुश्रीही तितक्याच जोरात त्याला उत्तर देत आहे.(Bigg Boss Marathi 6)

============================

हे देखील वाचा: लग्नघटिका समीप आली! मालिका विश्वातील आणखी एक अभिनेता अडकणार लग्नबंधनात; समोर आले खास फोटो !

============================

यावेळी राकेश इतका का चिडला? आणि या भांडणात शेवटी कोणाची बाजू जिंकणार? घरातील शांत आणि संयमी राकेशचा हा अचानक अस्वस्थपणा प्रेक्षकांसाठी एक मोठा प्रश्न बनला आहे. प्रेक्षक आता या वादाचा परिणाम आणि पुढे होणाऱ्या घटनांची अपेक्षा करत आहेत.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!