Skip to content Skip to sidebar Skip to footer

संगीतकार ओ पी नय्यर आणि Mohammad Rafi यांच्यातील मतभेद कसे मिटले?

प्रत्येकाचा इगो असतोच असतो . ठराविक मर्यादेपर्यंत तो असणे गरजेचे देखील आहे. पण हाच इगो जरूरी पेक्षा जास्त ताणला गेल्याने हाच इगो त्या व्यक्तीला मागे खेचत असतो.  कलावंतांचा इगो अगोदरच जरा  जास्त मोठा असतो. त्यातून बऱ्याचदा गैर समज निर्माण होतात, मतभेद होतात प्रसंगी वादा वादी होते. संगीतकार ओ पी नय्यर आणि पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्यात एका क्षुल्लक कारणावरून केवळ इगो मुळे दुरावा निर्माण झाला होता. या मुळे ओ पी नय्यर यांनी रफी सोबत काम करणे बंद केले होते.  तब्बल तीन चार वर्षे हे दोघे कलावंत एकत्र काम करत नव्हते. नेमकं काय कारण झालं होते या दोघांच्या मतभेदाचे आणि पुन्हा एकदा समेट कसा घडून आला याचा खूप इंटरेस्टिंग आणि भावस्पर्शी असा किस्सा आहे. 

साठ च्या दशकाच्या मध्यावर  ‘सावन की घटा’ (काही अभ्यासकांच्या मते ‘हमसाया’)  या चित्रपटाच्या गाण्याचे रेकॉर्डिंग चालू होते.  या चित्रपटात रफी यांच्या स्वरात एक गाणे रेकॉर्ड करायचे होते.  रेकॉर्डिंग ची सगळी तयारी झाली होती. संगीतकार ओपी नय्यर आणि सर्व म्युझिशियन्स  तयार होते.  आता इंतजार होता तो रफी साहेबांचा.  सर्व जण रफी यांची वाट पाहत होते.  रफी तसे वेळेच्या बाबतीत खूप दक्ष असायचे. वेळेचे अगदी काटेकोरपणे पालन करायचे.   पण आज मात्र त्यांना काही कारणाने उशीर होत होता. इकडे रेकॉर्डिंग स्टुडिओ त  सर्व जण कंटाळले.  दोन अडीच तासानंतर रफी यांचे स्टुडिओत आगमन झाले. रफी यांनी आल्या आल्या सर्वांची मनापासून माफी मागितली आणि माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

संगीतकार ओ पी यांना रफी म्हणाले की,”  काय करू? संगीतकार  शंकर जयकिशन यांचे एक रेकॉर्डिंग इतके  लांबत गेले  की मला तिथे थांबणे भाग पडले!” आता मात्र ओ पी नय्यर यांचा रागाचा पारा आणखी वाढला. शंकर जयकिशन यांच्या नाव ऐकल्यानंतर ते भयंकर संतापले. ते रफी यांना म्हणाले ,”तुम्ही शंकर-जयकिशन  यांना एक्स्ट्रा वेळ देऊ शकता आणि ओ पी नय्यर यांची वेळ का पाळू  शकत नाही? मला अशा गैर जिम्मेदार लोकांची गरज नाही.  तुम्ही जाऊ शकता!!”  आणि त्यांनी आपल्या प्रोडक्शन मॅनेजरला बोलावून  सांगितले,”  सर्व म्युझिशियन्सचे पैसे देऊन टाका स्टुडिओचे भाडे देऊन टाका.  आजचे रेकॉर्डिंग कॅन्सल!”  रफी सुद्धा निमूटपणे आपल्या कार मध्ये जाऊन बसले.

त्या काळात ओ पी नय्यर आणि शंकर जयकिशन यांच्यात व्यावसायिक स्पर्धा होती त्यात बळी मात्र नाहक रफी यांचा जात होता.  त्यानंतर ओ पी  यांनी रफी यांचा स्वर पुढची तीन साडेतीन वर्ष वापरलाच नाही या काळात त्यांचा प्रामुख्याने महेंद्र कपूर यांचा स्वर वापरला. रसिकांना मात्र याचा खूप मोठा फटका बसला कारण रफी आणि ओपी हे कॉम्बिनेशन खूप जबरदस्त होते. रफी नेक दिल इंसान होते. खुदा का नेक बंदा.  शेवटी ही कोंडी रफी यांनी फोडली. एकदा ते ओपी नय्यर यांच्या घरी गेले आणि त्यांना दोन मिठी मारली. क्षणार्धात दोघांमधील मतभेदाचे मळभ क्षणार्धात गळून पडले. दोघांच्या ही डोळ्यातून आसवांच्या  धारा वाहत होत्या. त्यानंतर ओपी आणि रफी पुन्हा एकत्र आले. ‘एक बार मुस्कुरा दो’(1972)  या चित्रपटात पुन्हा रफी यांचा स्वर ओ पी च्या संगीतात  दिसू लागला.  

================================

हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.

=================================

पुढे रफीच्या अंतापर्यंत ओपी यांनी रफी ही जोडी अबाधित राहिली. या जोडी ने 52 सिनेमातून 202 गाणी दिली. सर्वच गाणी लाजवाब. आप यूं ही गर हमसे मिलती रहे देखिये एक दिन प्यार हो जायेगा (एक मुसफिर एक हसीना) आपके हसीन रुख पे आज नया नूर है मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर (बहारे फिर भी आयेगी) जवानी या ये  मस्त मस्त बिन पिये (तुमसा नही देखा) पुकारता चला हूं मै (मेरे सनम), फिर मिलोगे कभी इस बात का वादा करलो (ये रात फिर न आयेगी) है दुनिया उसी की जमाना उसीका (काश्मीर कि कली) जाने कहां मेरा जिगर (मिस्टर अँड मिसेस फिफ्टी फाईव्ह) मोहब्बत करलो जी भर लो (आर पार) ये है बॉम्बे मेरी जान (सीआयडी)

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!