Skip to content Skip to sidebar Skip to footer

Bigg Boss Marathi 6: आता होणार अजून धिंगाणा! बिग बॉसच्या घरात होणार राखी सावंतची एन्ट्री…

‘बिग बॉस मराठी 6’ (Bigg Boss Marathi 6)च्या घरात सध्या घडामोडी चांगल्याच रंगात आल्या आहेत. अलीकडेच दिव्या शिंदेची ( Divya Shinde) शोमधून झालेली हकालपट्टी आणि आता आणखी एका धक्कादायक वळणाची चर्चा यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोशल मीडियावर सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे ड्रामा क्वीन राखी सावंतची ( Rakhi Sawant) बिग बॉसच्या घरात एन्ट्री. सध्या घरातील नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याच्या कारणावरून दिव्या शिंदेला ‘बिग बॉस’ने घराबाहेरचा रस्ता दाखवला. घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. या घटनेनंतर याच आठवड्यात एकाहून अधिक सदस्य शोमधून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आधीच तापलेल्या वातावरणात आता आणखी मसाला मिळणार असल्याचं चित्र आहे.(Rakhi Sawant In Marathi Bigg Boss 6)

Rakhi Sawant
Bigg Boss Marathi 6

मिळालेल्या माहितीनुसार, राखी सावंत ‘बिग बॉस मराठी 6’मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून नव्हे, तर पाहुणी कलाकार म्हणून दाखल होणार आहे. सोशल मीडियावर बिग बॉसच्या घरातील एक फोटो व्हायरल होत असून त्यामुळे राखीच्या एन्ट्रीच्या चर्चांना हवा मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राखी सावंत सुमारे 15 दिवस घरात मुक्काम करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र ती नक्की पाहुणी म्हणून येणार की पुढे स्पर्धक बनणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. हिंदी आणि मराठी ‘बिग बॉस’मध्ये आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे, वादग्रस्त भांडणांमुळे आणि मनोरंजनामुळे राखी कायम चर्चेत राहिली आहे. त्यामुळे यावेळी ती कोणाला लक्ष्य करणार आणि कोणासोबत वाद रंगवणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Rakhi Sawant
Bigg Boss Marathi 6

दरम्यान, या आठवड्यातील ‘भाऊच्या धक्क्या’वर सूत्रसंचालक रितेश देशमुख घरातील सदस्यांची चांगलीच कानउघाडणी करणार असल्याची चर्चा आहे. सध्या घरात एकूण 9 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामध्ये ओमकार राऊत, आयुष संजीव, सचिन कुमावत, प्रभू शेळके, दिपाली सय्यद, अनुश्री माने, रोशन भजनकर, राकेश बापट आणि दिव्या शिंदे यांचा समावेश आहे.(Rakhi Sawant In Marathi Bigg Boss)

===========================

हे देखील वाचा: Gaurav More ने स्वतः सांगितले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्याचे कारण म्हणाला,’सुरुवातीला ते मजेशीर वाटत होतं, पण…’

===========================

आतापर्यंत राधा पाटील, सोनाली राऊत आणि दिव्या शिंदे हे तीन स्पर्धक घराबाहेर पडले आहेत. आता चौथ्या आठवड्यात कोणाचा प्रवास संपणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.‘बिग बॉस मराठी 6’ हा शो दररोज रात्री 8 वाजता ‘कलर्स मराठी’ आणि ‘जिओहॉटस्टार’वर प्रेक्षकांना पाहायला मिळतो.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!