Skip to content Skip to sidebar Skip to footer

“मागील जन्मातील जो तुमचा शत्रू असतो, तोच..”; Prajakta Mali लव्ह लाईफबद्दल काय म्हणाली?

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या ‘देवखेळ’ (Dev Khel) या वेब सीरीजमुळे खास चर्चेत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा गेले अनेक वर्ष ती होस्ट करत असून सोबतच चित्रपटांमध्येही ती कामं करताना दिसत असते. एकीकडे तिच्या प्रोफेशनल आयुष्याविषयी चर्चा सुरु असतेच पण प्राजक्ता वैयक्तिक जीवनात जोडीदार कधी निवडणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. अखेर तिनेच याचं उत्तर देत मागच्या जन्माचा उल्लेख केला आहे. नेमकं ती काय म्हणाली आहे जाणून घेऊयात… (Prajakta Mali)

तर, सध्या व्हेलेंटाईन वीक सुरु आहे. त्यामुळे आपल्या आवडीच्या कलाकारांच्या जीवनातील व्हेलेंटाईन कोण आहे? हे जाणून घेण्याची प्रत्येक चाहत्यांची उस्तुकता असतेच आणि ती प्राजक्ताच्या बाबतीतही आहे. आपल्या लव्ह लाईफबद्दल प्राजक्ताने बोलताना प्रेम ही केवळ क्षणिक भावना नसून, ती मागील जन्मातील कर्मांशी जोडलेली संकल्पना असल्याचं प्राजक्ताने यावेळी सांगितलं. (Valentine Week 2026)

‘मुंबई टाइम्स कार्निव्हल’ या कार्यक्रमात प्राजक्ताला प्रेमाबद्दल तिचं मत विचारण्यात आलं असता, तेव्हा ती म्हणाली की, “हा विषय सगळ्यांनाच आवडतो, पण तो तितकाच अवघडही आहे. जे लगेच, उत्स्फूर्तपणे वाटतं, ते मला प्रेम वाटत नाही. ते आकर्षण असतं. प्रेम तेव्हाच होतं, जेव्हा दोन व्यक्तींमध्ये खोलवर कार्मिक कनेक्शन असतं“. (Marathi Entertainment News)

पुढे प्राजक्ता असं देखील म्हणाली की, “असी फिलॉसॉफी आहे की की, मागील जन्मातील जो तुमचा शत्रू असतो, तोच या जन्मात तुमचा जोडीदार असतो. जर मागील जन्मातील शत्रूत्व सौम्य असेल, तर या जन्मातलं नातंही तसंच असतं. माझं जास्त वाचन असल्यामुळे प्रेमाची संकल्पनाच बदलून गेली आहे”.

================================

हे देखील वाचा : “मराठी चित्रपटात काम करण्यासाठी मी मराठी बोलायलाही शिकेन”; Vijay Sethupati ने जिंकलं महाराष्ट्राचं मन!

================================

दरम्यान, प्राजक्ताच्या नव्या आयुष्याची सुरुवात कधी होते याकडे तिचे चाहते डोळे लावून आहेतच, परंतु, दुसरीकडे ‘फुलवंती’ चित्रपटानंतर आता ती कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार? आणि अभिनय व निर्माती नंतर आता दिग्दर्शनाकडे देखील ती वळणार का हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नक्कीच आतुर आहेत.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!