Skip to content Skip to sidebar Skip to footer

Apurva Gore Wedding: शुभमंगल सावधान! ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात; समोर आले लग्नसोहळ्याचे फोटो…

सध्या मराठी मनोरंजनविश्वात लग्नसोहळ्यांची धूम पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार आपल्या आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशातच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा गोरे (Actress Apurva Gore) हिनेही आयुष्यातील नवा टप्पा सुरू केला आहे. ‘स्टार प्रवाह’वरील गाजलेल्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत ईशा ही भूमिका साकारून अपूर्वा घराघरांत पोहोचली होती. अरुंधतीची धाकटी मुलगी म्हणून तिने साकारलेला स्वभावी आणि भावनिक अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. आता हीच लाडकी अभिनेत्री अभिनेता अंशुमन जोशीसोबत (Actor Anshuman Joshi) विवाहबंधनात अडकली आहे.(Apurva Gore Wedding)

Apurva Gore and Anshuman Wedding
Apurva Gore Wedding Photo

अंशुमन जोशी हा ‘शाळा’ (Shala Movie) या चित्रपटातून मुख्य भूमिकेत झळकला होता. लग्नानंतर अपूर्वाने या खास दिवसाचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. या फोटोंना तिने साधंसं पण अर्थपूर्ण असं “श्री व सौ” हे कॅप्शन दिलं आहे.लग्नसोहळ्यात अपूर्वाने पारंपरिक मराठी लूक केला होता. हिरव्या रंगाची जांभळ्या काठाची साडी, नाकात नथ, मोजके दागिने असा तिचा साज अतिशय आकर्षक दिसत होता. तर अंशुमनने पांढरा कुर्ता आणि पिवळं धोतर परिधान केलं होतं. दोघांनी निवडलेलं हे साधं पण देखणं कलर कॉम्बिनेशन चाहत्यांना विशेष आवडलं.

Apurva Gore and Anshuman Wedding
Apurva Gore Wedding Photo

यानंतर दोघांनी दुसऱ्या लूकमध्येही फोटो काढले. यात अपूर्वाने लाल रंगाची साडी आणि पिवळी शाल परिधान केली होती. अंशुमनने पांढरी शेरवानी, लाल शाल आणि लाल-पांढरा फेटा असा पारंपरिक पेहराव केला होता. या लूकमध्येही दोघं खूप उठून दिसत होते. काही दिवसांपूर्वीच अपूर्वाने अंशुमनसोबतचे काही फोटो शेअर करत आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. हिरव्या साडीत, गळ्यात नाजूक ठुशी आणि हातात गुलाब घेऊन केलेल्या त्या फोटोशूटने चाहत्यांचं विशेष लक्ष वेधलं होतं. त्या फोटोंना तिने “ठरलं! चाफा आणि तो… मला खूप आवडतात…” असं मनमोहक कॅप्शन दिलं होतं.(Apurva Gore Wedding)

================================

हे देखील वाचा: स्टार प्रवाहवर येणाऱ्या ‘आनंदी’ मालिकेतून अभिनेते Arun Nalawade आणि Sameer Dharmadhikari  मालिका विश्वात पुनरागमन!

================================

आता त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अपूर्वा आणि अंशुमनच्या या नव्या आयुष्याच्या सुरुवातीसाठी चाहत्यांसह अनेक कलाकार त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. 

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!