Skip to content Skip to sidebar Skip to footer

राजू, रँचो अन् फरहान हे त्रिकूट पुन्हा एकत्र येणार?; 3 Idiots 2 बाबत मोठी अपडेट समोर

राजकुमार हिरानी यांचं दिग्दर्श असणारा ‘३ इडियट्स’ (3 Idiots) हा चित्रपट रिलीज होऊन चक्क १६ वर्ष पूर्ण झाली.. पण आजही रॅंचो, फरहान आणि राजू आपल्याला आपल्याच मित्रांसारखे वाटतात… चित्रपटाची आणि प्रत्येक कलाकाराची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम राहिली आहे… आणि आता लवकरच हे ३ मित्र धमाल-मस्ती करण्यासाठी आपल्या भेटीला येणार आहेत… पिंकव्हीलाच्या अपडेट्सनुसार लवकरच आमिर खान, आर. माधवन, शरमन जोशी आणि करिना कपूर-खान यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ३ इडियिट्स चित्रपटाचा सीक्वेल येणार असल्याची शक्यता आहे… (3 Idiots movie sequel)

मिडिया रिपोर्टनुसार, ‘३ इडियट्स’च्या दुसऱ्या भागात आमिर खान, करीना कपूर, आर.माधवन आणि शर्मन जोशी मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र दिसणार आहेत. राजकुमार हिरानी यांच्या खांद्यालवर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा असणार असून विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि आमिर खान तिघे मिळून याची निर्मिती करणार आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट फायनल झाली असून लवकरच शुटींगला सुरुवात होईल असं सांगितलं जात आहे… दरम्यान, चित्रपटाच्या पहिल्या भागात फरहान आणि राजू यांचं करिअर सेट झालंय, रॅंचो अर्थात फुंसुक वांगडू आणि पिया यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेत आणि त्यांचीही लाईफ सुरळीत सुरु होते असा एन्ड झाला होता… आता १६ वर्षांनी पुन्हा ३ मित्र एकत्र येत त्यांचं रियुनियन होणार अशून पुन्हा एका नव्या Adventure प्रवासाची सुरुवात ३ इडियट्स २ मध्ये असेल असं सांगितलं जात आहे.. त्यामुळे पुन्हा एकदा या तीन मित्रांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.. (Entertainment News)

२००९ मध्ये ३ इडियट्स या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कल्ला केला होता… बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिला चित्रपट होता… इतकंच नाही तर युएस, युके, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये त्या वर्षातील हाईएस्ट ग्रॉसिंग चित्रपट म्हणून याची नोंद झाली होती… परदेशात ‘३ इडियट्स’ने ‘दबंग’, ‘चेन्नई एक्सप्रेस’ (Chennai Express) या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून काढले होते… (Bollywood Movie Box Office Collection)

================================

हे देखील वाचा : वयाच्या ४४व्या वर्षी Aamir Khan याला मराठी बोलता यावं असं का वाटलं?

================================

दरम्यान, कलाकारांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, नुकताच आर माधवन याचा ‘धुरंधर’ चित्रपट रिलीज झाला… तर, सितारे जमीन पर चित्रपटात आमिर खान झळकला होता आणि लवकरच तो ‘लाहौर १९४७’ मध्ये दिसणार आहे… तर, करिना कपूर मेघना गुलजार यंच्या दायरा चित्रपटात दिसणार आहे. शिवाय, ‘तख्त’, ‘वीरे दी वेडींग २’ असे तिचे आगामी चित्रपट रिलीज होणार आहेत.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!