Skip to content Skip to sidebar Skip to footer

Bai Tujha Ashirwad New Serial: घराला घरपण देणाऱ्या आणि ते जपणाऱ्या स्त्रीची गोष्ट येतेय ३० मार्चपासून भेटीला !

मराठी टीव्ही मालिकांमध्ये समाजाशी निगडित, विचार करायला लावणारे विषय नेहमीच प्रेक्षकांना आकर्षित करतात. अशाच एक अनोखी मालिका स्टार प्रवाहवर येत आहे जिच नाव  आहे ‘बाई तुझा आशीर्वाद’. या मालिकेत घर चालवणारी, नात्यांमध्ये समतोल साधणारी, जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणारी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झगडणारी स्त्री म्हणजेच ‘बाई’ या कथानकाची केंद्रबिंदू आहे.  (Bai Tujha Ashirwad New Serial)

Bai Tujha Ashirwad New Serial
Bai Tujha Ashirwad New Serial

 कथेची सुरूवात एका पुरुषप्रधान घरातून होतो, जिथे अवनी नावाची बाई प्रवेश करते. तिच्या आगमनाने घरात फक्त एक व्यक्ती नव्हे तर संवाद, समज, आपुलकी आणि खरी घरपणाची ऊर्जा येते. अवनीच्या आशीर्वादामुळे त्या घराचे वातावरण बदलते, नात्यांमध्ये सामंजस्य वाढते आणि घर एका सुखद, संतुलित कुटुंबात रूपांतरित होते. मालिकेत दाखवायचे हेच की, बाई म्हणजे फक्त घर चालवणारी नाही, तर घराला खरी ओळख आणि जिवंतपणा देणारी शक्ती आहे. (Bai Tujha Ashirwad New Serial)

Bai Tujha Ashirwad New Serial
Bai Tujha Ashirwad New Serial

स्टार प्रवाहच्या व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले की, “घराला घरपण एका बाईमुळे येते. तिचे अस्तित्व म्हणजे घराचा आशीर्वाद आहे. या मालिकेत दाखवायचे प्रयत्न केले आहेत की, अशा बाईच्या उपस्थितीने घरात नवा जीव कसा फूटतो. प्रेक्षकांना ही गोष्ट नक्कीच भावेल.” या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे आणि सुनील तावडे सोबतच नवोदित कलाकार अक्षता अनिता प्रमोद, अर्णव वॅरिअर, पुष्कर सराड, सतीश तांदळे, राघव वर्तक यांचा सहभाग आहे. मालिकेची निर्मिती निखिल शेठ आणि विनोद लव्हेकर यांच्या पोतडीने केली असून, दिग्दर्शनही विनोद लव्हेकर करणार आहेत. कथा लेखनाची जबाबदारी अमोल पाटील यांनी पार पाडली आहे. (Bai Tujha Ashirwad New Serial)

===============================

हे देखील वाचा: ‘भाग्य दिले तू मला’ या फेम Vivek Sangale चे इन्स्टाग्राम अकाउंट गेल्या ६५ दिवसांपासून बंद; तक्रार करूनही प्रतिसाद न मिळाल्याची व्यक्त केली खंत

===============================

‘बाई तुझा आशीर्वाद’ ही मालिका स्टार प्रवाहच्या आशयसमृद्ध परंपरेला नवा उत्साह देईल. प्रेक्षक ३० मार्चपासून रोज रात्री ९ वाजता या मालिकेचा थरार अनुभवू शकतील. घराला घर बनवणाऱ्या बाईच्या आशीर्वादाची ही गोष्ट प्रेक्षकांना भावेल आणि कुटुंबातील नात्यांची खरी किंमत पुन्हा जाणवून देईल.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!