Skip to content Skip to sidebar Skip to footer

Zakir Khan मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल; कॉमेडियनला नक्की झालं तरी काय?

प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन झाकीर खान (Stand Up Comedian Zakir Khan) सध्या रुग्णालयात दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतीच त्याने स्टँड-अप कॉमेडीपासून काही काळ ब्रेक घेण्याची घोषणा केली होती. त्यामागे आरोग्याशी संबंधित कारण असल्याचेही त्याने सांगितले होते. सध्या तो मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समजत आहे. झाकीरचा धाकटा भाऊ अरबाज खानने (Arbaaz Khan) रमजान दरम्यान आपल्या व्हीलॉगमध्ये त्याची एक झलक शेअर केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अरबाज प्रथम आपल्या दिवसाचा आढावा देताना दिसतो. त्यानंतर तो रुग्णालयात पोहोचल्याचे सांगतो. व्हिडिओमध्ये दिसणारी रूम एखाद्या आलिशान हॉटेलसारखी वाटत असल्याचेही अनेकांनी नमूद केले आहे. काही वेळाने झाकीर खानही व्हिडिओमध्ये दिसतो. त्यावेळी अरबाज त्याची तब्येत विचारतो. (Zakir Khan Health Update)

Zakir Khan Health Update
Zakir Khan Hospital Video

त्या वेळी खोलीत उपस्थित सर्वजण टी-२० वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहताना दिसतात. त्यावर झाकीर हलक्या फुलक्या अंदाजात म्हणतो, “मॅच अजूनही अडकली आहे.” त्यामुळे त्याचा नेहमीचा विनोदी अंदाज कायम असल्याचेही दिसून आले. व्हिडिओच्या शेवटी आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि त्यांची पत्नी श्रद्धाही तिथे उपस्थित असल्याचे दिसते. झाकीर त्यांच्यासोबत हसत-खेळत गप्पा मारताना दिसल्याने त्याची प्रकृती स्थिर असल्याचा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला आहे.

Zakir Khan Health Update
Zakir Khan Hospital Video

या व्हिडिओवर झाकीर खानने स्वतः कमेंट सेक्शनमध्ये तीन रेड हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. मात्र चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर कमेंट करत त्याच्या तब्येतीबद्दल विचारणा केली. एका युजरने लिहिले, “झाकीर खान, तुम्ही ठीक आहात ना? ईदच्या आधी लवकर बरे व्हा.” तर दुसऱ्याने विचारले, “कृपया झाकीर भाईंबद्दल काहीतरी सांगा. ते कसे आहेत?” काही चाहत्यांनी थेट प्रश्नही विचारला की तो रुग्णालयात का दाखल आहे.(Zakir Khan Health Update)

============================

हे देखील वाचा: Actress Neena Gupta ६६ वर्षी खरचं प्रेग्नेंट आहेत? स्वतः अभिनेत्रीने दिल उत्तर…

============================

दरम्यान, एका कार्यक्रमात झाकीर खानने स्टँड-अपमधून ब्रेक घेण्याबाबत बोलताना सांगितले होते की त्याच्याकडे लेखनाचे बरेच काम प्रलंबित आहे. गेल्या सहा वर्षांत ते पूर्ण करता आले नव्हते. त्याने असेही स्पष्ट केले होते की त्याची तब्येत थोडी बिघडली असली तरी ती फार गंभीर नाही आणि इंटरनेटवर फिरत असलेल्या अनेक अफवा खऱ्या नाहीत. तसेच एका मुलाखतीत त्याने आपल्या कुटुंबात काही आनुवंशिक आजार असल्याचे सांगितले होते. हे आजार विशिष्ट वयानंतर जाणवू लागतात. सततच्या कामामुळे शरीरावर ताण आल्याने आता काही काळ विश्रांती घेणे आवश्यक असल्याचे त्याने नमूद केले होते.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!