Skip to content Skip to sidebar Skip to footer

Ticket To Finale चा मानकरी कोण ठरणार?

बिग बॉस मराठीच्या घरात आता Ticket To Finale चा टास्क रंगणार आहे. पहिल्या दिवसापासून घरात स्ट्रेटजी आखत, वेगवेगळ टास्क खेळत टॉप ७ सदस्य आता अंतिम टप्प्यातील बिग बॉसचा खेळ खळताना दिसणार आहेत. या ७ स्पर्धकांना थेट फायनलिस्ट होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे घरात या टास्कसाठी चुरशीची लढत दिसणार आहे. परंतु, राकेश बापट आणि विशाल कोटिय यांच्यात झालेल्या राड्यानंतर विशाल कोटियन संपूर्ण सीझनपर्यंत नॉमिनेट असून त्याची ही संधी हुकली आहे. (Big Boss Marathi Season 6)

सोशल मिडियावर Ticket To Finale चा प्रोमो शेअर केला आहे. यात असं दिसतं की, बिग बॉस घरातील सदस्यांना म्हणतात, “बिग बॉस आपल्याला संधी देत आहेत मोठी झेप घेण्याची… कारण बिग बॉस घेऊन आले आहेत सीझन ६चं तिकीट टू फिनाले. तिकीट टू फिनाले जिंकणारा पहिला सदस्य ठरला आहे”.  आता नेमकी फायनलमध्ये पोहोचण्याची संधी कोणाला मिळाली आहे आणि कोणाची हुकली आहे हे पाहणं रंजक ठरणार आहे. (Ticket To Finale Promo)

गेल्या आठवड्यात सागर कारंडे याचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. सध्या Reva Kaurase घराची कॅप्टन असल्यामुळे ती थेट १३व्या आठवड्यात पोहोचली आहे. तर, तिच्यासह बाकीचे सदस्य Tanvi Kolte, Rakhi Sawant, अनुश्री माने, विशाल कोटियन, दिपाली सय्यद आणि राकेश बापट Ticket To Finale चा टास्क खेळताना दिसणार आहेत. तसेच, लवकरच घरात पत्रकार परिषद होणार असून पत्रकार कोणाला टार्गेट करणार? कोणता सदस्य सडेतोड उत्तर देणार हे देखील पाहावं लागेल.

================================

हे देखील वाचा : Big Boss Marathi Season 6 : तन्वी आणि विशाल फायनलिस्ट आहेत का?

================================

सध्या घरात काटा आणि टोळी हे दोन ग्रुप जरी असले तरी टोळीमधील केवळ Vishal Kotian आणि अनुश्री माने सोडता सगळ्यांची दांडी गुल झाली आहे. अशातच काटा ग्रुप फार स्ट्रॉंग दिसत असला तरी आजच्या एपिसोडमध्ये त्यांच्यातही वादाची ठिणगी पडलेली दिसणार आहे. रेवा कौरसे आणि तन्वी कोलते यांच्यात नव्या टास्कमध्ये वाद झाला असून यात Tanvi Kolte आणि रेवा एकमेकांविरोधात केस लढणार आहेत. सोशल मिडियावर रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये दिसतं की तन्वी रेवाला तिचा काहीच गेम नसल्याचं स्पष्टपणे सांगताना दिसते. आता दोघींमध्ये केवळ टास्कपुरती नोकझोक होणारी की सीझन संपेपर्यंत असणार हे पाहणं आता इंटरेस्टिंग असणार आहे. (Fight Between Tanvi Kolte & Reva Kaurase)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!