Skip to content Skip to sidebar Skip to footer

Vikram Gokhle यांच्या मरणोत्तर शेवटचा ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर येणार!

Vikram Gokhle हे नाव म्हणजे चालतं फिरतं अभिनयाचं विद्यापीठचं. आजही ‘अग्निहोत्र’ मालिकेतील मोरेश्वर अग्निहोत्री म्हटलं की विक्रम काकांचा चेहरा डोळ्यांसमोर तरळतो. नाटक, चित्रपट मालिका या मनोरंजनाच्या वेगवेगळ्या माध्यमांत त्यांनी विविधांगी भूमिका साकारत आपलं वलय निर्माण केलं. मात्र, २६ नोव्हेंबर २०२२ मध्ये विक्रम काकांनी या जगाचा निरोप घेतला आणि संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टी पोरकी झाली. दरम्यान, विक्रम गोखलेंच्या निधनानंतर तब्बल ४ वर्षांनी त्यांची अभिनय केलेली शेवटची कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. (Marathi Latest News)

विक्रम गोखले यांनी कायम ह्रदयस्पर्शी भूमिका साकारत प्रेक्षकांना आपलंसं केलं. आणि आता अभिनेता म्हणून त्यांचं शेवटचं काम लवकरच मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. ‘बेवारस’ (Bewaras) या त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर गुढीपाडव्याच्या निमित्ताने रिलीज करण्यात आलं असून लवकरच हा चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. ‘बेवारस’ या चित्रपटात अनाथालय चालवणाऱ्या तत्वनिष्ठ आबाजींची कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक अनाथ मुलगा स्वत:च्या अधिकारांसाठी आपल्याच आई वडिलांना कोर्टात का खेचतो? नेमकी त्याची संघर्षाची काय कथा आहे ते आपल्याला यात पाहता येणार आहे. (Bewaras Marathi Movie 2026)

‘बेवारस’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत विक्रम गोखले असून त्यांच्यासोबत तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit), रोहिणी हट्टंगडी, उषा नाईक, निहार गिते, ऋतुजा बागवे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी, श्रीजित मराठे, आदित्य देशमुख अशी कलाकार मंडळी दिसणार आहे. विक्रम काकांच्या प्रत्येक कलाकृती या अजरामर आहेतच आणि आता याच यादीत ‘बेवारस’ चित्रपटाची भर पडली असून प्रेक्षक त्यांचा हा शेवटचा चित्रपट पाहायला उस्तुक आहेत.

विक्रम गोखले यांच्या कामाबद्दल खरं तर बोलावं तितकंच कमी आहे.  भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्गाबाई कामत (Durgabai Kamat) या विक्रम गोखलेंच्या पणजी होत्या. त्यामुळे घरातूनच त्यांना अभिनयाचं बाळकडू मिळालं. वयाच्या २६व्या वर्षी विक्रम काकांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. आणि विशेष म्हणजे त्यांना पहिलाच ब्रेक थेट बिग बी Amitabh Bachchan यांच्या Parwana या हिंदी चित्रपटात मिळाला. तर, ‘अनोळखी’ हा मराठी चित्रपट त्यांचा नायक म्हणून पहिला चित्रपट ठरला.

लहानपणी त्यांनी ‘आग्य्राहून सुटका’, ‘राजसंन्यास’, ‘बेबंदशाही’ या नाटकांमध्ये कामं केली. त्याच काळात ‘शेवग्याच्या शेंगा’ या चित्रपटातही त्यांनी अभिनय केला होता. रंगभूमीवर आपलं सर्वस्व वाहून देणारे विक्रम गोखले ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकामुळे घराघरांत पोहोचले. संवादांमधील पॉझ देखील बोलका करणारे अभिनयातीय बॅरिस्टर विक्रम गोखले हे दिग्दर्शिका Vijaya Mehta यांचे शिष्य. (Vikram Gokhle Marathi Plays)

नाटक आणि विक्रम गोखले हे समीकरण फार वेगळं आणि पक्क होतं. ‘बॅरिस्टर’, ‘अपराध मीच केला’, ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘जास्वंदी’, ‘स्वामी’, ‘महासागर’, ‘जावई माझा भला’, ‘दुसरा सामना’, ‘आणि मकरंद राजाध्यक्ष’, ‘संकेत मीलनाचा’, ‘खरं सांगायचं तर’, ‘आप्पा आणि बाप्पा’, ‘नकळत सारे घडले’ यांसारख्या नाटकांत त्यांनी उल्लेखनीय कामं केली. तसेच, ‘ढाई अक्षर प्यार के’, ‘जरा मुस्करा दो’ या हिंदी नाटकांमध्येही ते दिसले. विंगेत उभं राहून अनेक अभिनेते-अभिनेत्री विक्रम गोखले यांना फक्त पाहून घडले. त्यांना रंगभूमीवर नाटक सादर करताना डोळ्यांदेखत पाहणं हे बऱ्याच कलाकारांचं स्वप्न होतं. त्यांच्या हयातीत ताकदीच्या कलाकारांची एक फौज घडली जी आजही प्रेक्षकांना आपलं उत्तम काम देण्यात मग्न आहे.

‘या सुखानों या’, माहेरची साडी, वजीर ‘एबी आणि सीडी’, ‘नटसम्राट’, ‘थोडं तुझं थोडं माझं’, ‘कळत नकळत’, ‘दुसरी गोष्ट’, ‘अनुमती’, ‘मी शिवाजी पार्क’, ‘आघात’, ‘वजीर’, ‘लपंडाव’, ‘नटसम्राट’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या. तसेच, ‘स्वर्ग नरक’, ‘इंसाफ’, ‘अग्निपथ’, ‘खुदा गवाह’, ‘अर्धम’, हम दिल दे चुके सनम’, ‘भूल भूलैय्या’, ‘दे दणा दण’, ‘मिशन मंगल’, ‘हिचकी’ अशा अनेक हिंदी चित्रपटांतही त्यांनी कामं केली. बरं, वेब सीरीज सारख्या नव्हा एन्टटेंनमेन्ट फॉर्मेटमधूनही त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ‘उडान’, ‘क्षितिज ये संजीवनी’, ‘जीवन साथी’, ‘सिंहासन’, ‘मेरा नाम करेगी रोशन’ या सीरिज मधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. अभिनयासह विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली होती. २०१३ मध्ये  रिलीत झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देत गौरवण्यात आले. (Vikram Gokhle Movies)

================================

हे देखील वाचा : पद्मश्री Ashok Saraf यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

================================

जवळपास ४०-५० वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीत काम करणारे Vikram Gokhl ७ वर्ष इंडस्ट्रीपासन लांब होते.  एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल असं म्हटलं होतं की, “मी फिल्मी दुनियेतून काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला कारण ज्या व्यवसायाकडे मी उपजिविकेचं साधन म्हणून पाहात होतो तिथेच घामाला, कष्टायला आर्थिकदृष्ट्या महत्व नसेल तर तिथे थांबून काय उपयोग. आणि म्हणूनच मी हे सारं काही सोडून, कोणालाही न फसवता १९८२ ते १९८९ या काळात इंडस्ट्रीपासून लांब होतो“. दरम्यान, मोठ्या पडद्यापासून जरी गोखले काही काळ लांब असले तरी त्यांचा दरारा हा कायम आपल्या मनात होता आणि राहणार आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!