
Poonam Pandey होणार आई? सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या ‘त्या’ फोटोंमुळे चर्चांना उधाण!
बोल्ड फोटो आणि व्हिडिओमुळे नेहमीच चर्चेत असणारी पूनम पांडे (Poonam Pandey) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे ते तिच्या नव्या सोशल मीडिया पोस्टमुळे.पण नेहमीच वादग्रस्त आणि अनपेक्षित गोष्टींमुळे चर्चेत राहणारी पूनम यावेळी एका वेगळ्याच कारणामुळे लक्ष वेधून घेत आहे. आणि त्याच कारण आहे तिच्या आई होण्याच्या संकेतांमुळे. (Poonam Pandey Pregnancy News)

अलीकडेच पूनमने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले, ज्यात ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या पोस्टमध्ये तिने कोणताही मजकूर न लिहिता फक्त बाळ, दूधाची बाटली आणि गर्भवती महिलेचे इमोजी वापरले आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि संभ्रम दोन्ही निर्माण झाले आहेत. काही जण तिचे अभिनंदन करत आहेत, तर काहींना हा फक्त आणखी एक पब्लिसिटी स्टंट वाटत आहे. विशेष म्हणजे, पूनमने लग्न न करताच आई होणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत.

लोकांच्या शंकेचं मुख्य कारण म्हणजे तिचा भूतकाळ. काही काळापूर्वी तिने स्वतःच्या मृत्यूबाबत खोटी बातमी पसरवून सगळ्यांनाच धक्का दिला होता. नंतर हा सगळा प्रकार कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी केला असल्याचं तिने स्पष्ट केलं. मात्र, त्या घटनेमुळे तिच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. आता पुन्हा एकदा ती अशाच प्रकारे चर्चेत आल्यामुळे लोक या बातमीकडेही संशयाने पाहत आहेत. विशेषतः एप्रिल फूल डे जवळ आल्यामुळे. (Poonam Pandey Pregnancy News)
==============================
हे देखील वाचा: Vishakha Subhedar यांच्या नाटकादरम्यान प्रेक्षकांसमोर नाट्यगृहाची नाचक्की; कलाकारांवर आली पडदा सरकवण्याची वेळ
==============================
सध्या तरी ही बातमी खरी आहे की आणखी एक स्टंट, याबाबत स्पष्टता आलेली नाही. पूनम खरंच आई होणार आहे का, की पुन्हा एकदा ती सगळ्यांना चकवणार आहे, याचं उत्तर येत्या काही दिवसांत मिळेल. तोपर्यंत मात्र सोशल मीडियावर या चर्चेला उधाण आलं आहे.