
Anandi Marathi Serial: अभिनेत्री सई रानडेची दमदार एण्ट्री; आता मालिकेत रंगणार नवा थरार आणि भावनिक संघर्ष…
मराठी प्रेक्षकांच्या हृदयात अल्पावधीतच घर करून बसलेली ‘आनंदी’ (Anandi Marathi Serial) मालिका आता एका जबरदस्त ट्विस्टसह पुढे जात आहे. मालिकेतील कथानक अधिक गुंतागुंतीचे आणि थरारक होण्यासाठी लवकरच शलाका ही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या भूमिकेस साकारणारी आहे सई रानडे (Sai Ranade) जिने मालिकेत येऊन कथेला नवा आयाम देण्याची तयारी केली आहे.(Anandi Marathi Serial)

शलाका ही एक अत्यंत प्रभावशाली आणि महत्वाकांक्षी स्त्री आहे, जिला स्वतःच्या सौंदर्य आणि संपत्तीचा गर्व आहे. ही प्रसिद्ध उद्योगपती युगंधर निंबाळकर यांची मेहुणी असून, त्यांची दिवंगत पत्नी समिधा आणि शलाका जुळ्या बहिणी असल्या तरी स्वभावात त्यांच्यात प्रचंड फरक आहे. समिधा शांत, समंजस आणि प्रेमळ होती, तर शलाका अहंकारी, उथळ आणि स्वतःच्या बळावर जगण्यास कटिबद्ध आहे. युगंधरने समिधाला जीवनसाथी म्हणून निवडले, ही गोष्ट शलाकाच्या मनात खोलवर घर करून आहे.

याच्या परिणामी शलाकाचा उद्देश स्पष्ट आहे. युगंधरला पराभूत करून स्वतःची सत्ता सिद्ध करणे. गारमेंट व्यवसायात तिने स्वतःचं साम्राज्य उभारले असून, आपल्या ध्येयासाठी ती नेहमी काळ्या रंगाचेच कपडे घालते, जे तिच्या व्यक्तिरेखेला आणखी गूढ आणि प्रभावी रूप देतात. मालिकेत तिच्या एन्ट्रीनंतर युगंधर आणि शलाका यांच्यातील संघर्ष, भावनिक गुंतागुंत आणि घरातील नातेसंबंध अधिक तीव्र होणार आहेत.(Anandi Marathi Serial)
==========================
==========================
आणि या संघर्षाचा परिणाम ‘आनंदी’च्या आयुष्यावर कसा होतो, कोण कुणावर भारी पडतो, याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. शलाकाच्या आगमनामुळे कथानकात रंगत, थरार आणि भावनिक उथळेपणा अधिक खुलणार आहे. प्रेक्षकांना ह्या सर्व थरारक घडामोडी पाहण्यासाठी ‘आनंदी’ मालिका रोज रात्री ९:३० वाजता स्टार प्रवाहवर पाहावी लागेल, आणि ही प्रवास कथा अधिक रंगीन व रोमहर्षक अनुभव देणार आहे.