Skip to content Skip to sidebar Skip to footer

Raja Shivaji Teaser: शिवरायांची शौर्यगाथा पुन्हा मोठ्या पडद्यावर! ‘राजा शिवाजी’चा अंगावर काटा आणणारा भव्य टीझर रिलीज

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji). भव्य ऐतिहासिक पार्श्वभूमी, दमदार स्टारकास्ट आणि प्रभावी सादरीकरणामुळे या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष लागले आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून, अल्पावधीतच त्याने चाहत्यांच्या मनात उत्सुकतेची ठिणगी पेटवली आहे. या चित्रपटाची निर्मिती  जिओ स्टुडिओज (Jio Studios) आणि मुंबई फिल्म कंपनी (Mumbai Film Company) यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांनी साकारली आहे. त्यांनीच आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर हा टीझर शेअर करत प्रेक्षकांना एक भव्य ऐतिहासिक अनुभवाची झलक दिली.(Raja Shivaji Teaser)

Raja Shivaji  MOvie
Raja Shivaji Teaser

सुरुवातीला ‘राजा शिवाजी’चा टीझर थिएटरमध्ये ‘धुरंदर: द रिव्हेंज’सोबत प्रदर्शित करण्यात आला होता. थिएटरमध्ये टीझरला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता तो डिजिटल प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांना मोठ्या पडद्यावर ही झलक पाहता आली नाही, त्यांनाही आता हा भव्य अनुभव घेता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना इतिहासाच्या वैभवशाली काळात घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेच्या ध्यासाची प्रभावी मांडणी टीझरमध्ये दिसून येते. युद्धनीती, भावनिक संवाद आणि भव्य दृश्यरचना यामुळे हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता प्रेरणादायी ठरणार आहे.

Raja Shivaji Movie
Raja Shivaji Teaser

टीझरसोबतच Riteish Deshmukh (Riteish Deshmukh – रितेश देशमुख) यांनी दिलेल्या कॅप्शननेही सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी अनेक वर्षांपासून जोपासलेलं स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत, शिवरायांच्या इतिहासाची भव्यता शब्दांत व्यक्त केली. त्यांच्या या भावनिक आणि अभिमानाने भरलेल्या शब्दांनी चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. या चित्रपटाची आणखी एक खास बाब म्हणजे त्याची भव्य स्टारकास्ट. जेनिलिया देशमुख (Genelia Deshmukh), संजय दत्त (Sanjay Dutt), अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan), विद्या बालन (Vidya Balan), महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar), सचिन खेडेकर (Sachin Khedekar), फरदीन खान (Fardeen Khan),  जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) आणि बोमन इराणी (Boman Irani) यांसारखे दिग्गज कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. एकाच फ्रेममध्ये इतक्या मोठ्या कलाकारांना पाहण्याची संधी मिळणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.(Raja Shivaji Teaser)

=============================

हे देखील वाचा: Prajakta Mali:’तू लग्न कधी करणार?’ चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिल भन्नाट उत्तर

=============================

विशेष म्हणजे, हा चित्रपट केवळ मराठीपुरता मर्यादित न राहता हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे शिवरायांचा इतिहास जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा हा एक मोठा प्रयत्न मानला जात आहे. ‘राजा शिवाजी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या १ मे, म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टीझरमधून मिळालेल्या झलकनंतर आता प्रेक्षक पूर्ण चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले असून, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर नक्कीच मोठा प्रभाव टाकेल, अशी चर्चा सध्या रंगली आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!